ECB Central Contract: इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय टेस्ट जॉनी बेअरस्टो करारातून आऊट, पण मर्यादित ओव्हरच्या करारात मिळवले स्थान, वाचा सविस्तर
दुसरीकडे, बेअरस्टोला कसोटी करारातून बाहेर केले असले तरी बोर्डाने त्याला मर्यादित ओव्हरच्या करारात स्थान दिले आहे.
सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलसाठी असलेल्या युएईमध्ये असलेला स्टार विकेटकीपर-फलंदाज जॉनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (England Cricket Board) 2020/2021 कसोटी केंद्रीय करारातून बाहेर केले, तर ओली पोप, झॅक क्रॉली आणि डोम सिब्ली यांना ईसीबीने रेड-बॉल करारात (ECB Test-Ball Contract) सामील केले. हे तीन क्रिकेटपटू आता इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट सेटअपचा नियमित भाग झाले आहेत. दरम्यान, 31 वर्षीय बेअरस्टोने डिसेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका दौर्यावर असताना इंग्लंडकडून अखेरचा कसोटी सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सेंच्युरियनमधील पहिली कसोटी होती ज्यात बेअरस्टोने केवळ 1 व 9 धावांची नोंद केली त्यानंतर इंग्लंडकडून त्याने कसोटी कसोटी क्रिकेट खेळला नाही. इतकंच नाही तर संपूर्ण आफ्रिका दौऱ्यादरम्यान त्याला बाहेर बसावे लागले. (आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नर याचे अनोखं अर्धशतक; 50 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा ठरला नववा खेळाडू)
बेअरस्टोला रेड बॉल करारापासून वगळण्यात आले आहे आणि त्याऐवजी पोप, क्रॉली आणि सिब्ली यांना गेल्या वर्षभरातील कामगिरीच्या कामगिरीमुळे कसोटी करारासाठीपदोन्नती मिळविली आहे. बेअरस्टोशिवाय विश्वचषक जिंकणारा दुसरा खेळाडू मार्क वूडलाही रेड-बॉल करारामधून वगळण्यात आले आणि त्याला मर्यादित ओव्हरचा स्पेशलिस्ट करार देण्यात आला आहे. केवळ कसोटी कर्णधार जो रूट, स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स, विकेटकीपर जोस बटलर आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि क्रिस वोक्स या यादीमध्ये सहभागी झाले आहेत. दुसरीकडे, बेअरस्टोला कसोटी करारातून बाहेर केले असले तरी बोर्डाने त्याला मर्यादित ओव्हरच्या करारात स्थान दिले आहे. पाहा 2020/21 साठी इंग्लंड बोर्डाची करार यादी:
कसोटी आणि व्हाइट बॉल: जोफ्रा आर्चर, जोस बटलर, जो रूट, बेन स्टोक्स आणि क्रिस वोक्स.
कसोटी करार: जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, ओली पोप, डोम सिब्ली आणि सॅम कुरन.
व्हाइट बॉल: मोईन अली, जॉनी बेअरस्टो, टॉम कुरन, इयन मॉर्गन, आदिल राशिद, जेसन रॉय आणि मार्क वूड.