RR Vs CSK, IPL 2020: राजस्थान रॉयल संघाचा चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी विजय

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने टॉस जिंकून राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते.

RR Vs CSK (Photo Credit: Instagram)

आयपीएल तेराव्या हंगामातील चौथा सामन्यात राजस्थान रॉयलच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जला 16 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने टॉस जिंकून राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाने कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नईच्या संघासमोर 217 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चेन्नईच्या संघाला 16 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.

पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला दुसऱ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाने चेन्नईच्या संघासमोर 20 षटकात 217 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, चेन्नईचा संघ केवळ 200 धावापर्यंतच मजल मारू शकला आहे. या सामन्यात राजस्थानच्या संघाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनने तडाखेबाज फलंदाजी केली. तर, चेन्नईच्या संघाकडून फाफ डू प्लेसिसने संघाला विजय मिळवून देण्यासाठी 37 चेंडूत 72 धावांची आक्रमक खेळी केली. परंतु, या सामन्यातील त्याची खेळी व्यर्थ गेली आहे. हे देखील वाचा- MS Dhoni: राजस्थान रॉयल विरुद्ध अखेर षटकात आक्रमक फलंदाजी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मिडियावर चर्चेत

आयपीएलचे ट्विट-

राजस्थान संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने 47 चेंडूत 69 धावा केल्या आहेत. तर, संजू सॅमसनने केवळ 32 चेंडूत 74 धावा ठोकल्या आहेत. एवढेच नव्हेतर वेगवान अर्धशतकाच्या यादीतदेखील समावेश केला आहे. त्यानंतर अखेरच्या षटकात फलंदाजी करायला आलेल्या जोफा आर्चर तुफान फलंदाजी करत 8 चेंडूत 27 धावा केल्या आहेत. ज्यामुळे राजस्थानच्या संघाला चेन्नईच्या संघापुढे 217 धावांचे लक्ष्य ठेवता आले आहे. तर, गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानकडून राहुल तेवतियाने 3, आर्चर, गोपाळ आणि करन या जोडीने प्रत्येकी 1 बळी घेतला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif