Delhi Capitals IPL 2021 Qualifier 2 Likely Playing XI: क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्स मोठा निर्णय घेणार? ‘या’ 11 खेळाडूंसह केकेआरशी भिडणार

जेतेपदाच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध फायनल खेळण्यासाठी क्वालिफायर-2 खेळला जाईल. दिल्ली संघ अधिक बळकट करून ते या सामन्यात प्रवेश करेल. जाणून घ्या अटीतटीच्या सामन्यात कशी असेल कॅपिटल्सची प्लेइंग -11.

दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021 DC Qualifier 2 Likely Playing XI: आयपीएलच्या (IPL) 14 व्या सत्राच्या समाप्तीसाठी आता फक्त 2 सामने शिल्लक आहेत. जेतेपदाच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध फायनल खेळण्यासाठी क्वालिफायर-2 खेळला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघांना कोणत्याही प्रकारची कसर सोडायची नाही आहे कारण फायनल सामन्यात पोहोचण्याची त्यांची ही अंतिम संधी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग दुसऱ्या सत्रात अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धारित असेल. दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदाच्या हंगामात गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून अतिशय चांगली कामगिरी केली आणि प्लेऑफमध्ये सहज स्थान मिळवले, पण त्यांना शेवटच्या, पहिल्या क्वालिफायर, सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आता या पराभवानंतर दिल्ली विजयपथावर परतण्यास सज्ज झाले आहेत. पण संघ अधिक बळकट करून ते या सामन्यात प्रवेश करेल. जाणून घ्या अटीतटीच्या सामन्यात कशी असेल कॅपिटल्सची प्लेइंग -11. (IPL 2021 Qualifier 2: दिल्ली की कोलकाता, फायनलमध्ये कोणता संघ सुपर किंग्सशी भिडणार; ‘या’ खेळाडूंच्या खेळीने लागणार दुसऱ्या क्वालिफायरचा निकाल)

चेन्नईविरुद्ध फायनल खेळण्यासाठी क्वालिफायर-2 मध्ये दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा रिषभ पंतच्या (Rishabh Pant) हाती असेल. पंतने नेतृत्व आणि फलंदाजीमध्ये विशेष छाप सोडली आहे. पंतला त्याच्या नेतृत्वाच्या सर्वात महत्वाच्या सामन्यात मधल्या फळीत बॅटने प्रभाव पाडून संघाचे काम सोपे करावे लागेल. तसेच शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ यांची जोडी पुन्हा एकदा सलामीला येऊन विरोधी संघावर वर्चस्व गाजवण्यासाठी उत्सुक असेल. श्रेयस अय्यर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवत नसला तरी त्याने त्याच्या संघाचा एक वरिष्ठ खेळाडू म्हणून पूर्ण जबाबदारी निभावली आहे. वेस्ट इंडिज सुपरस्टार शिमरॉन हेटमायरने मोठी खेळी खेळली नसली तरी त्याने छोटा डाव खेळून आपल्या संघाला भरपूर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्याचे स्थान देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम राहील. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल खूप खास दिसत नाही. अक्षराने या मोसमात फिरकी गोलंदाजीमध्ये केवळ छाप पाडली नाही, तर गरजेच्या वेळी फलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे. त्यामुळे त्याला संघात आणखी एक संधी दिली जाऊ शकते.

अश्विन संघाचा दुसरा फिरकीपटू असेल. अश्विनने त्याच्या गोलंदाजीमुळे निराशा केली आहे पण पंत महत्वपूर्ण सामन्यात विश्वास दाखवेल. गोलंदाजी आक्रमणात कगिसो रबाडा हे एक मोठे नाव आहे. आणि या संघासाठी तो एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला वगळण्याचा धोका दिल्ली पत्करू शकत नाही. यंदाच्या हंगामात दिल्लीसाठी कोणत्याही गोलंदाजाने सर्वात जास्त प्रभाव पाडला असेल तर तो आवेश खान आहे. पर्पल कॅप शर्यतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत तो सहज दिल्ली प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होतो. गेल्या वर्षापासून वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टजेने दिल्ली संघात वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गोलंदाजाच्या वेगाने अनेक फलंदाज आश्चर्यचकित झाले आहेत. नॉर्टजेने या हंगामात ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवू शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif