DC vs SRH, IPL 2024: चुरशीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम

तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत.

DC vs SRH (Photo Credit - Twitter)

DC vs SRH, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात होणार आहे. दिल्लीच्या घरच्या मैदानावरील अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील हा सामना सुरू होईल. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. या मोसमात आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सने सात सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत. तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत. (हे देखील वाचा: DC vs SRB, IPL 2024 Head to Head: अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली-हैदराबाद आमनेसामने, जाणून घ्या आकडेवारीत कोण आहे वरचढ)

आजच्या स्पर्धेत होऊ शकतात हे मोठे विक्रम 

सनरायझर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज जयदेव उनाडकट इंडियन प्रीमियर लीगमध्ये 100 वा आयपीएल सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये, दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला 1500 धावा पूर्ण करण्यासाठी 29 धावांची गरज आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 150 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी नऊ षटकारांची गरज आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज एडन मार्करामला आणखी 66 धावांची गरज आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये 100 बळींचा टप्पा गाठण्यासाठी सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज जयदेव उनाडकटला आणखी पाच विकेट्सची गरज आहे.

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालला इंडियन प्रीमियर लीगमध्ये १०० षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी दोन षटकारांची गरज आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ललित यादवला इंडियन प्रीमियर लीगमध्ये ५० झेल पूर्ण करण्यासाठी तीन झेल आवश्यक आहेत.