Dean Jones Death: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू डीन जोन्स यांना वाहिली श्रद्धांजली
गुरूवारी दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि भाष्यकाराच्या निधनाची बातमी समजताच शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स (Dean Jones) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. गुरूवारी दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. जोन्स यांच्या निधनाने क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी देखील ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि भाष्यकाराच्या निधनाची बातमी समजताच शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. "ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू व समालोचक डीन जोन्स यांचे मुंबई येथे आकस्मिक निधन झाल्याचे समजून अतिशय वाईट वाटले. या दुखद प्रसंगी दिवंगत आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना व त्यांच्या चाहत्यांना कळवतो," असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे." (Dean Jones Dies in Mumbai: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांना क्रीडाविश्वातून श्रद्धांजली; सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह अनेकांनी व्यक्त केलं दु:ख)
“डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. आम्ही त्याच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीत दु:ख पचवण्याची शक्ती देवो. जोन्स यांच्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांशी संपर्क साधत आहोत”, असे स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले. जोन्स यांना आदरांजली वाहत स्टार इंडियाने लिहिले, “डीन जोन्स हे दक्षिण आशियामधील क्रिकेटच्या विकासासाठी बराच काळ झटत होते. ते या विभागातील क्रिकेटचे सदिच्छादूत होते. नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना शोधणे आणि त्यांच्यातून तरुण नवे क्रिकेटर्स तयार करणे हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. डीन जोन्स हे एक ‘चॅम्पियन’ समालोचक होते. त्यांच्या समालोचनाच्या खेळकर शैलीने त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवले. जगभरातील त्यांचे कोट्यवधी चाहते आज नाराज असतील आणि त्यांना मिस करत असतील.”
जोन्स यांनी 1984 आणि 1994 अशा 10 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाकडून 52 कसोटी आणि 164 वनडे सामने खेळले. त्यांनी रेड बॉल क्रिकेटमध्ये 46 शतक आणि 14 अर्धशतकांसह 46.55 च्या सरासरीने 3631 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्यांनी 44 शतक आणि 46 अर्धशतकांसह 44.61 च्या सरासरीने 6068 धावा केल्या आहेत.