DC vs RCB, IPL 2020: दिल्लीची बल्ले-बल्ले! धवन-रहाणेच्या अर्धशतकाने DC ची रॉयल चॅलेंजर्सवर 6 विकेटने मात, प्ले ऑफसाठी केले क्वालिफाय

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 153 धावांचं प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर 6 विकेट एकतर्फी विजय मिळवला. धवन 54 तर रहाणेने 70 धावा केल्या. आरसीबीविरुद्ध आजच्या सामन्यातील विजयासह दिल्लीने प्ले ऑफसाठी क्वालिफाय केले.

अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

DC vs RCB, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 153 धावांचं प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर 6 विकेट एकतर्फी विजय मिळवला. आरसीबीविरुद्ध (RCB) आजच्या सामन्यातील विजयासह दिल्लीने प्ले ऑफसाठी क्वालिफाय केले. मुंबई इंडियन्सनंतर (Mumbai Indians) प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा दिल्ली दुसरा संघ ठरला. तर आरसीबीला आजच्या सामन्यातील पराभवाने मोठा फटका बसला आहे. या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या स्थानावर होते, मात्र आजच्या सामन्यात पराभव झाला असला तरी आरसीबीने देखील प्ले ऑफ फेरी गाठली आणि तिसरे स्थान मिळवले.  शिवाय, आजच्या सामन्यात दिल्लीसाठी धवन 54 तर रहाणेने 70 धावा केल्या. श्रेयस अय्यर 7 धावा करून माघारी परतला. दुसरीकडे, आरसीबी गोलंदाजांनी संघाला सामन्यात पुनरागमन करून देण्याचे प्रयत्न केले, पण कमी धावसंख्येमुळे ते अपयशी ठरले. आरसीबीसाठी शाहबाझ अहमदला 2 तर मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळाली. (IPL 2020 PlayOffs: ठरलं! मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार क्वालिफायर-1, दुबई येथे होणार महामुकाबला)

बेंगलोरने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करता धवनने जोरदार सुरुवात केली, पण सलामीला आलेला पृथ्वी शॉ पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि 9 धावा करून माघारी परतला. त्यानंतर धवन आणि रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. या दरम्यान सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झलेल्या धवनने अर्धशतक ठोकले. धवनने रहाणेसह डाव हाताळला आणि आयपीएलचे 40वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 37 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. धवनने शाहबाज अहमदच्या चेंडूवर 54 धावांवर शिवम दुबेकडे झेलबाद झाला. टीकेचा बळी ठरलेल्या अजिंक्य रहाणेने 37 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह अर्धशतक झळकावले. मोक्याच्या क्षणी रहाणे देखील चुकीचा शॉट खेळत बाद झाला. अखेरीस रिषभ पंत आणि मार्कस स्टोइनिस यांनी संघाला विजयीरेष ओलांडून दिली.

यापूर्वी, देवदत्त पडिक्क्लच्या झुंझार अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने 152 धावांपर्यंत मजल मारली.एबी डिव्हिलिअर्सने (AB de Villiers) 35 आणि विराट कोहलीने 29 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, दिल्लीसाठी एनरिच नॉर्टजेने (Anrich Nortje) सर्वाधिक 3 तर कगिसो रबाडाला 2 आणि रविचंद्रन अश्विनला 1 विकेट मिळाली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now