DC vs KXIP, IPL 2020 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या सत्रातील दुसर्या सामन्यात दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब ज्यांची आयपीएलमधील कामगिरी सातत्यपूर्ण आणि विशेष राहिली नाही आज आमने-सामने येणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात रविवार, 20 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात दोन सर्वात यशस्वी संघांचा सामना झाला, तर दुसर्या सामन्यात दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) ज्यांची आयपीएलमधील (IPL) कामगिरी सातत्यपूर्ण आणि विशेष राहिली नाही आज आमने-सामने येणार आहे. आयपीएल 2020 चा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात रविवार, 20 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल आणि टॉस सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7.00 वाजता होईल. भारतात प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपण या सामन्याचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अॅपवर पाहू शकता. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (MI vs CSK IPL 2020 Stats: एमएस धोनीने आयपीएलमध्ये केले विजयाचे शतक; दीपक चाहर, पियुष चावला यांच्याकडूनही विक्रमी कामगिरी)
पहिल्या 11 मोसमात चांगली कामगिरी न करणाऱ्या दिल्ली फ्रँचायझीने 12 व्या मोसमात आपले नाव दिल्ली डेअरडेव्हिल्स वरुन दिल्ली कॅपिटल्स केले आणि गेल्या वर्षीही ही टीम यशस्वी ठरली. 2019 मध्ये दिल्लीने सात वर्षांच्या अंतरानंतर प्लेऑफमध्ये स्थान मिळवले पण चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) ) पराभव झाला. गेल्या वर्षी चांगली कामगिरी बजावल्यानंतर दिल्लीने कर्णधार श्रेयस अय्यर, विकेटकीपर रिषभ पंत आणि कगिसो रबाडासह आपला मुख्य संघ कायम ठेवला. दुसरीकडे, लीग सुरू होण्यापूर्वी पंजाब नेहमीच कागदावर बळकट दिसणारा संघ होता परंतु वेळ येताच खेळाडूंना चांगली कामगिरी करता येत नाही.
अॅलेक्स कॅरी, जेसन रॉय यांना आपल्या संघात आणून दिल्लीने त्यांची फलंदाजी मजबूत केली. फ्रेंचायझीने शिमरॉन हेटमायरर आणि मार्कस स्टोइनिस यांना महागड्या किंमतीत संघात समाविष्ट केले आहे. या व्यतिरिक्त दिल्लीने अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन यांनाही विकत घेतले आहे. अश्विनला सामील करून दिल्लीने आपली फिरकी विभाग मजबूत केले आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसह किंग्ज इलेव्हन पंजाबसह हा तिसरा संघ आहे जिने अद्याप आयपीएल जेतेपद जिंकले नाही. यंदा केएल राहुल पंजाबचे नेतृत्व करताना दिसेल. किंग्ज इलेवनच्या टॉप ऑर्डरमध्ये क्रिस गेल आहे जो एकटा सामना पलटू शकतो. जर तो हंगामाच्या सुरूवातीस लयीत आला तर तो कोणत्याही टीमवर विजय मिळवू शकतो. गेल आणि राहुलची सलामी जोडी कशी खेळते यावरही बरेच काही अवलंबून असेल.
येथे पाहा दोन्ही संघ
दिल्ली कॅपिटल्स टीम: श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, अॅलेक्स कॅरी, जेसन रॉय, पृथ्वी शॉ, रिषभ पंत (विकेटकीपर), शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, क्रिस वोक्स, ललित यादव, मार्कस स्टोइनिस, कीमो पॉल, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, ईशांत शर्मा, कगिसो रबाडा, मोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, संदीप लमिछाने आणि तुषार देशपांडे.
किंग्स इलेव्हन पंजाब टीम: केएल राहुल (कॅप्टन), करुण नायर, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मुजीब उर रहमान, क्रिस गेल, मनदीप सिंह, मयंक अग्रवाल, हार्डस विल्जॉईन, दर्शन नालकंडे, सरफराज खान, अर्शदीप सिंह, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन, के गौतम, जे सुचीथ, ग्लेन मॅक्सवेल, शेल्टन कॉटरेल, दीपक हुड्डा, ईशान पोरेल, रवि बिश्नोई, जेम्स नीशाम, क्रिस जॉर्डन, तेजिंदर ढिल्लन आणि प्रभसिमरन सिंह.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)