DC vs KKR, IPL 2020: पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरचा तडाखा! दिल्लीने KKRला दिले 229 धावांचे आव्हान

दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 228 धावा केल्या. पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतकी डाव खेळला. पृथ्वी 66 धावा करून माघारी परतला तर श्रेयसने नाबाद 88 धावा केल्या.

श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/IPL)

DC vs KKR, IPL 2020: शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील सामन्यात श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) दिल्लीने पहिले बॅटिंग करून केकेआरला (KKR) 229  धावांचे आव्हान दिले. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 228 धावा केल्या. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि कर्णधार श्रेयसने अर्धशतकी डाव खेळला. पृथ्वी 66 धावा करून माघारी परतला तर श्रेयसने नाबाद 88 धावा केल्या. श्रेयसने 26 चेंडूत पन्नास धावांचा टप्पा गाठला आणि आयपीएलमधील आपले सर्वात जलद अर्धशतक ठोकले. शिखर धवनने 26, रिषभ पंतने 38 धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेल 2, वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नागरकोटी यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. आजच्या सामन्यात केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून दिल्लीला पहिले फलंदाजीसाठी बोलावले. (DC vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, DCमध्ये रविचंद्रन अश्विनचे 'कमबॅक')

दिल्लीने आजच्या सामन्यात शानदार सुरुवात केली. पृथ्वी आणि धवनमध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली असताना 56च्या धावसंख्येवर धवन माघारी परतला. त्यानंतर पृथ्वीने कर्णधार श्रेयससोबत 73 धावांची भागीदारी केली. या दरम्यान पृथ्वीने आपले अर्धशतक पूर्ण केले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पृथ्वीलानागरकोटीने कॅच आऊट केले. अखेर श्रेयसने पंतसोबत डाव पुढे नेला आणि शारजाहच्या मैदानावर टीमला आव्हानत्म धावसंख्या उभारून दिली. दरम्यान, श्रेयसने आयपीएलमधील सातवे अर्धशतक ठोकले. पंत आणि अय्यरमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली व दोघे मोठे फटके खेळत राहिले. दरम्यान, केकेआरकडून आयपीएलचा सर्वात महागडा पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती यांनी सर्वाधिक 4 ओव्हरमध्ये 49 धावा लुटवल्या. मार्कस स्टोइनिस 1 धावा करून माघारी परतला.

आजच्या मॅचसाठी दोन्ही टीमने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. कोलकाताने कुलदीप यादवऐवजी राहुल त्रिपाठीला टीममध्ये घेतलं, तर दिल्लीने अक्षर पटेलऐवजी रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्माऐवजी हर्षल पटेलला संधी दिली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली तिसऱ्या आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि कोलकाताने त्यांचे 3 पैकी 2 सामने जिंकले आणि एका मॅचमध्ये दोघांना पराभव पत्करावा लागला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif