AUS vs SL T20I 2019: डेव्हिड वॉर्नर जेव्हा गिफ्ट करतो ग्लोव्ह्ज; छोट्या चाहत्याला भावना अनावर; पाहा Video

वॉर्नरने नकळत सराव स्तरातून बाहेर जाताना नकळत आपले ग्लोव्हज भेट देऊन एका युवा चाहत्याचा दिवस बनविला. ड्रेसिंग रूमकडे जात असताना वॉर्नरने आपले ग्लोव्हजची जोडी तरुण फॅनकडे दिले जो हातात एक बँक्स घेऊन स्टँड्समध्ये उभा होता.

(Photo Credit: Twitter/cricket.com.au)

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघातील पहिल्या टी-20 मॅचमध्ये शानदार खेळ करत डेविड वॉर्नर (David Warner) याने प्रेक्षकांची मनं जिंकली. श्रीलंकाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वॉर्नरने नाबाद शतक केले. हे वॉर्नरच्या टी-20 करिअरमधील पहिले शतक होते. वॉर्नरने आधी एरोन फिंच आणि नंतर ग्लेन मॅक्सवेल याच्या साथीने चांगली भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकासमोर 223 धावांचा मोठा लक्ष्य ठेवला. त्यानंतर गोलंदाजांनी दमदार कार्य करत श्रीलंकेला 9 बाद 99 धावांवर रोखले. वॉर्नरने यात महत्वाची भूमिका बजावली. वॉर्नरने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली. दोन्ही संघातील पुढील सामना उद्या, 30 ऑक्टोबरला गाब्बा स्टेडियममध्ये खेळला जाईल. त्याआधी ऑस्ट्रेलिया संघाने गाब्बामध्ये खूप मेहनत केली. आणि यादरम्यान वॉर्नरचे एक हृदयस्पर्शी जेस्चर पाहून सोशल मीडिया यूजर्स भारावून गेले. (AUS vs SL 1st T20I: कसुन रजिता याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवला नकोसा रेकॉर्ड, 4 ओव्हरमध्ये लुटवल्या इतक्या धावा)

वॉर्नर, जो आपला 33 वा वाढदिवस साजरा करीत होता, त्याने नकळत सराव स्तरातून बाहेर जाताना नकळत आपले ग्लोव्हज भेट देऊन एका युवा चाहत्याचा दिवस बनविला. ड्रेसिंग रूमकडे जात असताना वॉर्नरने आपले ग्लोव्हजची जोडी तरुण फॅनकडे दिले जो हातात एक बँक्स घेऊन स्टँड्समध्ये उभा होता. www.cricket.com.au वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पहिले तो युवा चाहता वॉर्नरचे ग्लोव्हज मिळालेले पाहून खूपच भारावून गेलेला दिसत होता. पहा याचा व्हिडिओ:

पुढच्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी श्रीलंकेविरुद्ध 33 वर्षीय डेव्हिड वॉर्नरने शानदार शतक झळकावले. वॉर्नरने 56 चेंडूत शतक ठोकले. वॉर्नरने पहिल्या टी-20 शतकात 8 चौकार आणि 3 षटकार लगावले. यादरम्यान, वॉर्नरने 56 चेंडूंच्या डावात 10 चौकार आणि चार षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाकडून टी-२० मध्ये शतक झळकावणारा वॉर्नर चौथा फलंदाज ठरला. त्यांच्याआधी ग्लेन मॅक्सवेल, एरोन फिंच आणि शेन वॉटसन यांनी ही कामगिरी केली आहे. पहिल्या विकेटसाठी वॉर्नरने कर्णधार अ‍ॅरोन फिंचबरोबर 122 धावांची दंडवत भागीदारी केली.



संबंधित बातम्या

IND vs AUS, 4th Test Pitch Report And Weather Update: चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज की ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज वर्चस्व गाजवतील? सामन्यापूर्वी, मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून

South Africa vs Pakistan, 1st Test Match Live Streaming In India: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिली कसोटी, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसे लाइव्ह मॅचचा आनंद घेता येणार

Australia vs India, Boxing Day Test: टीम इंडिया मेलबर्नमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करू शकेल का? बॉक्सिंग डे कसोटीत सर्वांच्या नजरा असणार या दिग्गज खेळाडूंवर

Virat Kohli Test Record Against Australia: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची अशी आहे कामगिरी, 'रन मशीन'; च्या आकडेवारीवर एक नजर