लॉकडाउनमध्ये सचिन तेंडुलकरने केलेल्या हेयरकट वर इंग्लंडची महिला क्रिकेटर Danielle Wyatt ने अर्जुन बाबत केली मजेदार कमेंट

चिनच्या पोस्टवर एक टिप्पणीने सर्वांचे लक्ष वेधले. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डेनियल व्याटने मास्टर-ब्लास्टरचा मुलगा अर्जुनला या पोस्टमध्ये टॅग करून एक वैध प्रश्न विचारला. तिने लिहिले, "अर्जुन तेंडुलकर आपण त्याच्यासाठी का कापले नाही?"

सचिन आणि अर्जुन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जवळपास संपूर्ण जगाला लॉकडाउनला (Lockdown) सामोरे जावे लागत आहे. सर्व खेळाडू त्यांच्या घरात चाहत्यांसमवेत वेळ घालवत आहेत. या काळात हे क्रिकेटर्स घरातील कामं आणि वर्क-आऊट करताना दिसतात. या दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) स्वतःचे केस कापून नवीन हेअरकट केला. 2013 मध्ये तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला असून, त्याची फॅन फॉलोव्हिंगमध्ये मात्र कमी झालेली नाही. नुकताच सचिनने स्वत:च्या केसांना एक नवीन रूप दिलं आहे. केवळ आवश्यक दुकानं खुली आणि इतर कामं तात्पुरती बंद असल्याने सचिनने स्वत:चे केस कापले आणि फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, "स्क्वेअर कटमध्ये खेळण्यापासून ते स्वत: चे केस कापण्यापर्यंत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा आनंद घेतला. माझे नवीन केस कसे दिसत आहेत." तेंडुलकरने फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी पोस्टवर त्याच्या नवीन हेअरकटचे कौतुक केले. तथापि, सचिनच्या पोस्टवर एक टिप्पणीने सर्वांचे लक्ष वेधले. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डेनियल व्याटने (Danielle Wyatt) मास्टर-ब्लास्टरचा मुलगा अर्जुनला (Arjun) या पोस्टमध्ये टॅग करून एक वैध प्रश्न विचारला. (सचिन तेंडुलकर कसा बनला ओपनर; अजहरुद्दीनकडे केली होती विनवणी, खूप रोचक आहे मास्टर-ब्लास्टरची सलामी फलंदाज बनण्याची कहाणी)

तिने लिहिले, "अर्जुन तेंडुलकर आपण त्याच्यासाठी का कापले नाही?" अर्जुन आणिव्याटमध्ये चांगली मैत्री असल्याचे म्हटले जाते. गेल्या आठवड्यात अर्जुनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर प्रश्नोत्तराच्या सत्रात व्याटला त्याची आवडती महिला क्रिकेटपटू असल्याचेही म्हटले. विशेष म्हणजे 2018 मध्ये अर्जुनआणि व्यॅटची भेट झाली होती. पाहा व्याटची कमेंट:

 

View this post on Instagram

 

From playing square cuts 🏏 to doing my own hair cuts 💇🏻‍♂️, have always enjoyed doing different things. ‪How’s my new hairdo 💁🏻‍♂️ looking @aalimhakim & @nandan_v_naik? 😋

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

पाहा व्याटची मजेदार प्रतिक्रिया

यापूर्वी लॉकडाउनमध्ये हेअरकटची मालिका टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सुरू केली होती. विराटने आपली पत्नी अनुष्का शर्माकडून हेअरकट केले होते. यानंतर पोर्तुगाल फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोनेही गर्लफ्रेंडकडून हेअरकट करून घेतले होते. आणि आता सचिनने एक पाऊल पुढे टाकत स्वतःच हेअरकट केले.