IPL Auction 2025 Live

CSK vs RCB IPL 2021 Match 19: Ravindra Jadeja ने Harshal Patel च्या एका ओव्हरमध्ये केला 5 षटकारांचा वर्षाव, युनिव्हर्स बॉसच्या विक्रमाची केली बरोबरी

यादरम्यान जडेजाने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलच्या इंडियन प्रीमियर लीगच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

रवींद्र जडेजा (Photo Credit: Twitter/@IPL)

CSK vs RCB IPL 2021 Match 19: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरोधात आयपीएलच्या (IPL) 19व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) घातक अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आरसीबीचा (RCB) आघाडीचा गोलंदाज हर्षल पटेलच्या डावातील 20व्या ओव्हरमध्ये कहर केला आणि एकूण 37 धावा चोपल्या. यादरम्यान जडेजाने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलच्या (Chris Gayle) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. जडेजाने आता गेलप्रमाणेच आयपीएलच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावांच्या विक्रमाची नोंद केली आहे. हर्षलच्या डावातील अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 37 धावा मिळाल्या पण एकूण 36 धावा एकट्या जडेजाने चोपल्या तर एक धाव त्यांना नो-बॉलच्या रूपात मिळाली ज्यावर देखील जडेजाने षटकार खेचला. (CSK vs RCB IPL 2021 Match 19: Faf du Plessis याची अर्धशतकी खेळी, जडेजाचा षटकारांचा पाऊस; चेन्नईचे आरसीबीला 192 धावांचं तगडं आव्हान)

दरम्यान, आयपीएलच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक 36 धावांची नोंद गेल आणि जडेजाच्या नावावर झाली आहे. हर्षलच्या अखेरच्या ओव्हरबद्दल बोलायचे तर जडेजाने 20व्या ओव्हरमध्ये पटेलच्या गोलंदाजीवर एकूण 5 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव आणि नो बोल अशा 37 धावा लुटल्या. विशेष म्हणजे जडेजाने सलग 4 चौकार लगावले आणि आपले दुसरे आयपीएल अर्धशतक पूर्ण केलं. ‘सर जडेजा’ने पटेलची अखेरच्या ओव्हरमध्ये क्लास घेतली आणि तो एकाच ओव्हरमध्ये सहा षटकारांचा विश्वविक्रम करेल की काय असे वाटत होते पण आरसीबी गोलंदाजाची लय लुटली आणि त्याने तिसरा चेंडू नो-बॉल दिला. हर्षलने यापूर्वी गोलंदाजीने फाफ डु प्लेसिस आणि सुरेश रैनाना तंबूत धाडत आरसीबीला सामन्यात कमबॅक करून दिलं होतं.

सामन्याबद्दल बोलायचे तर चेन्नईने बेंगलोरला विजयासाठी 192 धावांचे तगडं आव्हान दिले आहे. जाडेजाने सर्वाधिक नाबाद 62 धावांची झंझावाती खेळी केली तर ओपनर फाफ डु प्लेसिसने 50 धावा आणि रुतुराज गायकवाडने 33 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे डु प्लेसिस-रुतुराजच्या सलामी जोडीत 74 धावांची अर्धशतकी भागीदारीने संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. दुसरीकडे, आरसीबीकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.