CSK vs RCB IPL 2021 Match 19: Faf du Plessis याची अर्धशतकी खेळी, जडेजाचा षटकारांचा पाऊस; चेन्नईचे आरसीबीला 192 धावांचं तगडं आव्हान

चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील आयपीएलच्या 19व्या सामन्यात सीएसकेने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 4 विकेट गमावून 191 धावांपर्यंत मजल मारली आणि आरसीबीला विजयासाठी 192 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. चेन्नईसाठी फाफ डु प्लेसिसने 41 चेंडूत 50 धावा केल्या तर रवींद्र जडेजा 62 धावा करून नाबाद परतला.

CSK vs RCB IPL 2021 Match 19: Faf du Plessis याची अर्धशतकी खेळी, जडेजाचा षटकारांचा पाऊस; चेन्नईचे आरसीबीला 192 धावांचं तगडं आव्हान
फाफ डु प्लेसिस आणि रुतूराज गायकवाड (Photo Credit: Twitter)

CSK vs RCB IPL 2021 Match 19: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघातील आयपीएलच्या 19व्या सामन्यात सीएसकेने (CSK) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 4 विकेट गमावून 191 धावांपर्यंत मजल मारली आणि आरसीबीला (RCB) विजयासाठी 192 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. चेन्नईसाठी फाफ डु प्लेसिसने (Faf du Plesis) 41 चेंडूत 50 धावा केल्या तर रुतुराज गायकवाडने 33 धावांचे योगदान दिले. कर्णधार एमएस धोनी 2 धाव आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 62 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, आरसीबीसाठी हर्षल पटेलने पुन्हा चमकदार कामगिरी करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शिवाय, युजवेंद्र चहलला 1 विकेट मिळाली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2021 05:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).