IPL Auction 2025 Live

CSK vs KXIP, IPL 2020: एमएस धोनीने जिंकला टॉस, चेन्नई सुपर किंग्सचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; मयंक अग्रवालचा पंजाबमध्ये समावेश

आजच्या सामन्यात सीएसके कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसके यापूर्वीच प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पडल्याने 13व्या हंगामातील आजचा त्यांचा हा अंतिम सामना असेल.

चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: PTI)

CSK vs KXIP, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 चा कारवां आता आपल्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहचला आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात 53वा आयपीएल (IPL) सामना अबू धाबी येथे खेळला जाईल. सीएसके यापूर्वीच प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पडल्याने 13व्या हंगामातील आजचा त्यांचा हा अंतिम सामना असेल. आजच्या सामन्यात सीएसके (CSK) कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी सीएसके आणि किंग्स इलेव्हनने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. सीएसकेसाठी आजचा सामना प्रतिष्ठेची लढाई आहे तर  पंजाबच्या संघासाठी खूप महत्वाचा आहे कारण या सामन्यात विजयासह किंग्ज इलेव्हन या मोसमातील प्ले ऑफ शर्यतीत कायम राहू शकतात. चेन्नई आणि पंजाबमधील आजचा सामना अबू धाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर खेळला जाईल. चेन्नई विजयासह स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या निर्धारित असतील, तर पंजाब आज पूर्ण सामर्थ्याने खेळू पाहत असतील. (CSK vs KXIP, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

क्रिस गेलच्या पुनरागमनानंतर पंजाब संघ बळकट झाला आहे आणि आपली सर्वोत्तम खेळण्याची करण्याच्या प्रयत्नात असेल. शिवाय आजच्या सामन्यात पंजाबसाठी मयंक अग्रवालचा समावेश झाला आहे. मनदीप सिंहचे स्थानही कायम आहे तर ग्लेन मॅक्सवेलच्या जागी जेम्स निशमला संधी देण्यात आली आहे. अर्शदीप सिंहच्या जागी मयंकचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, चेन्नईने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले. फाफ डु प्लेसिस, इमरान ताहीर आणि शार्दूल ठाकूर यांना शेन वॉट्सन, मिशेल सॅटनर आणि कर्ण शर्मा यांच्या जागी संधी देण्यात आली आहे.

पाहा सीएसके आणि किंग्स इलेव्हन प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स: एमएस धोनी (कॅप्टन), फाफ डु प्लेसिस, रुतूराज गायकवाड, अंबाती रायुडू, एन जगदीसन, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, लुंगी एनगीडी, इमरान ताहिर.

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, दीपक हुडा, जेम्स नीशम, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमी.