CSK vs KXIP, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना स्टार नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित होईल, तर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर उपलब्ध असेल.

चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: PTI)

CSK vs KXIP, IPL 2020 Live Streaming: एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premie League) 2020 चा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. 13 पैकी 5 सामन्यात विजय आणि 8 पराभवामुळे चेन्नईचे प्ले ऑफमधील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले होते, तर पंजाब संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या निर्धाराने चेन्नईविरुद्ध खेळती. चेन्नई आणि पंजाब यांच्यातील आजचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल, तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे 3:00 वाजता होईल. चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना स्टार नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित होईल, तर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020: आधी एमएस धोनीला केलं क्लीन बोल्ड, मग CSK कर्णधाराकडूनच KKRच्या वरुण चक्रवर्तीला मिळाल्या टिप्स, पाहा Video)

शुक्रवारी राजस्थान रॉयल्सकडून पराभवाने पंजाबच्या पाच सामन्यांच्या विजयाची मालिका मोडली. या पराभवामुळे संपूर्ण पॉईंट्स टेबलची रंगात कायम राहिली असून उर्वरित तीन जागांसाठी सहा संघ रिंगणात आहेत. जर किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव झाला तर ते प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील, आणि जर जिंकले तर सनरायझर्स हैदराबादने उर्वरित दोन सामन्यांपैकी किमान एक सामना गमवावा अशी त्यांना आशा असेल. दुसरीकडे, चेन्नईसाठी देखील विजय महत्वाचा असेल कारण त्यांचा पराभव झाल्यास ते पहिल्यांदा गुणतालिकेच्या तळाशी बसलेले दिसतील.

पाहा चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघ

चेन्नई सुपर किंग्ज: एमएस धोनी (कॅप्टन), मुरली विजय, रुतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सॅम कुरन, मिशेल सॅंटनर, केदार जाधव, रवींद्र जडेजा, पियुष चावला, मोनू कुमार, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, केएम आसिफ, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, आर साई किशोर, लुंगी एनगीडी आणि जोश हेजलवुड.

किंग्ज इलेव्हन पंजाबः केएल राहुल (कॅप्टन), करुण नायर, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मुजीब उर रहमान, क्रिस गेल, मनदीप सिंह, मयंक अग्रवाल, हार्डस विल्जॉईन, दर्शन नलकंडे, सरफराज खान, अर्शदीप सिंह, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, जगदीशा सुचित, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉटरेल, दीपक हूडा, ईशान पोरेल, रवी बिश्नोई, जेम्स नीशम, क्रिस जॉर्डन, तजिंदर ढिल्लन, प्रभिसिमरन सिंह.