CSK vs KKR, IPL 2020: ड्वेन ब्रावोची वाढदिवशी विक्रमी कामगिरी, नाईट रायडर्सविरुद्ध 3 विकेट घेत झाला मलिंगा, पियुष चावला यांच्या एलिट यादीत सामील

20व्या ओव्हरमध्ये ब्रावोने नागरकोटी आणि शिवम मावी यांना माघारी पाठवेल आणि गोलंदाजांच्या एलिट यादीतही सामील झाला. मावीची विकेट ब्रावोच्या आयपीएल कारकिर्दीतील 150वी विकेट होती.

ड्वेन ब्रावो (Photo Credit: Twitter/IPL)

CSK vs KKR, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनी डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी ड्वेन ब्रावोवर (Dwayne Bravo) अनेकदा अवलंबून दिसला आहे आणि वेस्ट इंडियन क्रिकेटपटूने देखील आपली योग्यता सिद्ध केली आहे. आयपीएलमधील (IPL) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) आजच्या सामन्यात देखील त्याने टीमला गरज असताना चेंडूने आपले कौशल्य दाखवले आणि नाईट रायडर्सच्या तीन खेळाडूंना माघारी पाठवले. बुधवारी त्याच्या 37 व्या वाढदिवशी ब्रावोने आयपीएलमध्ये एका विशेष कामगिरीची नोंद केली जी त्याच्यापूर्वी फक्त चार गोलंदाजांनीच केली होती. सलामीवीर राहुल त्रिपाठी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने केकेआर मोठा स्कोर करणार का असे दिसत होते. 10व्या ओव्हरमध्ये त्याने ब्रावोला एक षटकार आणि एक चौकार ठोकला. पण 20व्या ओव्हरमध्ये ब्रावोने जबरदस्त पुनरागमन केले आणि नागरकोटी आणि शिवम मावी यांना माघारी पाठवेल. ब्रावोने ओव्हरमध्ये केवळ 5 धावा दिल्या आणि गोलंदाजांच्या एलिट यादीतही सामील झाला. (CSK vs KKR, IPL 2020: बाउंड्रीवर रवींद्र जडेजा-फाफ डु प्लेसिसने घेतला शानदार कॅच, पाहून नेटकरीही झाले अवाक Watch Video)

मावीची विकेट ब्रावोच्या आयपीएल कारकिर्दीतील 150वी विकेट होती आणि हा टप्पा गाठणारा तो फक्त पाचवा गोलंदाज ठरला. तो आता सीएसकेचा अन्य दिग्गज हरभजन सिंहबरोबर संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे. संघाचा सहकारी पीयूष चावलामी 156 विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडीयनने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तीन गडी बाद केले आणि संघाला 167 धावांवर ऑलआऊट केले. दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाच्या नावावर आहे ज्याने 170 गडी बाद केले आहेत. यानंतर अमित मिश्रा (160), आणि चावला (156) तिसऱ्या स्थानावर आहेत. यंदा आयपीएलमध्ये चावलाला अमित मिश्राच्या पुढे जाण्याच्या संधी आहे, ज्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 167 धावांवर ऑलआऊट झाली आणि सीएसकेसमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य दिले आहे. केकेआरने आजच्या सामन्यात फलंदाजी क्रम बदललेला दिसला, परंतु त्यांना एक फायदा म्हणजे राहुल त्रिपाठीने स्वतःला सिद्ध केले आणि सार्वधिक धावा ठोकल्या. अन्य कोणताही केकेआर फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही.