CSK vs DC, IPL 2020: पृथ्वी शॉचे दमदार अर्धशतक, दिल्ली कॅपिटल्सने CSK समोर दिले 176 धावांचे टार्गेट

सामन्यात चेन्नईनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थितीत दिल्लीने पहिले फलंदाजी करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 175 धावा केल्या आणि सीएसकेसमोर 176 धावांचे लक्ष्य दिले.

पृथ्वी शॉ (Photo Credit: PTI)

दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) आणि तीनवेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात आयपीएलचा 7वा सामना दुबई येथे खेळला जात आहे.  सामन्यात चेन्नईनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थितीत दिल्लीने पहिले फलंदाजी करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 175 धावा केल्या आणि सीएसकेसमोर (CSK) 176 धावांचे लक्ष्य दिले. दिल्लीकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांनी आक्रमक सुरुवात केली. पृथ्वीने अर्धशतक करत सर्वाधिक 64 धावा केल्या. धवन 35, श्रेयस अय्यर 26 धावा करून बाद झाला. रिषभ पंत 37 आणि मार्कस स्टोइनिस 5 धावा करून नाबाद परतले.  पियुष चावलाने (Piyush Chawla) 2 विकेट, सॅम कुरनने 1 विकेट घेतली. सीएसकेकडून डेब्यू करणाऱ्या हेजलवुडने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. त्याला एकही विकेट मिळाली नसली तरी त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त धावच दिल्या. (CSK vs DC, IPL 2020: एमएस धोनीने मैदानावर उतरताच केली सुरेश रैनाच्या 'या' खास विक्रमाची बरोबरी)

दिल्लीकडून पृथ्वी आणि धवन यांनी डावाची सुरुवात केली. एकीकडे पृथ्वीने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली, तर धवन सावध फलंदाजी करताना दिसला. या दरम्यान, पृथ्वीने 35 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. पृथ्वी आणि धवनची जोडी धोकादायक ठरत असताना चावलाने धवनला 35 धावांवर बाद केले आणि दिल्लीला पहिला झटका दिला. चावलाच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप शॉट मारण्याच्या प्रयत्नात धवन एलबीडब्ल्यू बाद झाला. त्यानंतर 43 चेंडूत 64 धावा करत पृथ्वीही बाद झाला. मोठा शॉट खेळण्याच्या नादात पृथ्वी क्रीजच्या पुढे आला, मात्र चेंडू-बॅटचा संपर्क झाला नाही आणि धोनीने पृथ्वीला स्टम्प आऊट केले. दोन्ही सलामी फलंदाज बाद झाल्यावर दिल्लीच्या धावा करण्याची गती कमी झाली. पंत आणि श्रेयसने दिल्लीचा डाव पुढे नेला व टीमला धावांपर्यंत मजल मारून दिली.

दरम्यान, आजच्या सामन्यासाठी दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन, तर सीएसकेने एक मोठा बदल केला. दिल्लीने अमित मिश्रा आणि आवेश खानला सामन्यासाठी टीममध्ये सामील केले, तर लुंगी एनगीडीच्या जागी जोश हेजलवुडला टीममध्ये घेतले.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif