CSK vs DC आयपीएल सामन्यात एमएस धोनीने पुन्हा दाखवली चपळता, अफलातून कॅच घेत श्रेयस अय्यरला धाडलं माघारी (Watch Video)
पंतसोबत श्रेयस सावध खेळ करत असताना धोनीने अप्रतिम झेल पकडला आणि दिल्ली कर्णधाराचा डाव संपुष्टात आणला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात धोनीच्या खेळीवर टीका करण्यात आली होती.
आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी दिली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दोघांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. पण दिल्लीचे दोन्ही सलामी फलंदाज बाद झाल्यावर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने डाव पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र, धोनीने पुन्हा एकदा आपल्या चपळतेचे प्रदर्शन केले आणि दिल्लीचा कर्णधार श्रेयसला माघारी पाठवलं. पंतसोबत श्रेयस सावध खेळ करत असताना धोनीने अप्रतिम झेल पकडला आणि दिल्ली कर्णधाराचा डाव संपुष्टात आणला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात धोनीच्या खेळीवर टीका करण्यात आली होती. त्यांची संधी फलंदाजी चर्चेचा विषय ठरली. मात्र, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धोनी पुन्हा एकदा आपल्यामध्ये तो जोश आणि चपळता शिल्लक असल्याचे दाखवून दिले. (CSK vs DC, IPL 2020: पृथ्वी शॉचे दमदार अर्धशतक, दिल्ली कॅपिटल्सने CSK समोर दिले 176 धावांचे टार्गेट)
दिल्लीविरूद्ध सामन्यात धोनीने आपली चपळाई पुन्हा एकदा दाखवून दिली. श्रेयसपूर्वी धोनीने पृथ्वी शॉला चपळाईने स्टंप आऊट केलं, तर त्यानंतर सुपरमॅन उडी मारत दिल्लीचा कर्णधार श्रेयसचा सुंदर कॅच पकडला. सॅम कुरनच्या गोलंदाजीवर श्रेयसने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून विकेटकीपरच्या डावी केली गेला आणि धोनीने चपळता दाखवत उडी मारून त्याचा झेल घेतला. पाहा हा व्हिडिओ:
दुसरीकडे, आजच्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करत दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 175 धावा करत चेन्नईला 176 धावांचे आव्हान दिले. दिल्लीकडून पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजी केली आणि 43 चेंडूत 64 धावा केल्या. पृथ्वी आणि शिखर धवनने दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. मात्र, पहिले धवन आणि नंतर पृथ्वी बाद झाल्यावर दिल्लीचा डाव गडगडला. श्रेयस 26 धावा करून बाद झाला. पंतने 37 धावा केल्या यात 6 चौकारांचाही समावेश होता. चेन्नईकडून पियूष चावलाने 2 तर सॅम कुरनने एक विकेट घेतली.