How to Download Hotstar & Watch CSK vs DC Live: चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील आयपीएल सामना लाईव्ह पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? जाणून घ्या
चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Photo)

CSK vs DC IPL Match 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier Leagu) 2020 च्या 7व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना दिल्ली कॅपिटलशी (Delhi Capitals) होईल. चेन्नईने आजवर या मोसमात आजवर दोन सामने खेळले आहेत. धोनीच्या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला, तर राजस्थान रॉयल्सविरुद्ध धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने आजवर खेळलेल्या एकमात्र सामन्यात विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात दिल्ली आपली विजयी लय कायम ठेवू पाहत असेल. कोरोना व्हायरसमुळे यंदा युएई (UAE) येथे आयपीएल (IPL) आयोजित केले आहेत. त्यामुळे, क्रिकेट प्रेमींना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्यासाठी शक्य होत नाही. आणि जर कोणताही कारणाने आपण टीव्हीवर आयपीएलचा 13वा हंगाम पाहण्यास असमर्थ असल्यास आपण Disney+ Hotstarवर लाईव्ह सामन्याचा आनंद लुटू शकतात. (CSK vs DC, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर)

अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आजचा सामना आपण डिस्ने + हॉटस्टार वर लाईव्ह पाहू शकतात. दोन्ही संघांमधील आजचा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

आपल्या मोबाइल फोनमध्ये हॉटस्टार डाउनलोड कसे करावे:

1- मोबाइलमध्ये हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. पहिले आपल्या मोबाइलच्या प्ले-स्टोअरवर जा आणि तेथे हॉटस्टार शोधा.

2- नंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या अ‍ॅप्स मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर आपल्याला हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकता.

5- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहू शकता.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.