रुतुराज गायकवाड आणि मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या अफेयर्सची चर्चा, पहा काय म्हणतो CSK फलंदाज

पण चेन्नई सुपर किंग्सच्या या युवा फलंदाजाने अफेरच्या चर्चा फेटाळून लावल्या.

सायली संजीव व रुतुराज गायकवाड (Photo Credit: Instagram)

Ruturaj Gaikwad-Sayali Sanjeev Allege Affair: मनोरंजन जगत आणि क्रिकेटमधील नातं काही लपलेलं नाही. जिथे अनेक बॉलीवूड अभिनेत्री क्रिकेटपटूंसोबत विवाह बंधनात अडकले आहेत तिथे आता आणखी एक नाव जुळताना दिसत आहे. आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) युवा फलंदाज रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आपल्या खेळीने चाहत्यांची मनं जिंकली असताना मराठमोळी अभिनेत्री सोबत अफेरची चर्चा सध्या रंगली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) फोटोवर रुतुराजच्या प्रतिक्रियेने दोंघांमधील संबांधांची चर्चा सुरु झाली आहे. पण चेन्नई सुपर किंग्सच्या या युवा फलंदाजाने अफेरच्या चर्चा फेटाळून लावत फक्त गोलंदाजच आपली विकेट घेऊ शकतात आणि क्लिन बोल्डही, असं म्हटलं. (IPL 2021 मध्ये ‘या’ 5 युवा खेळाडूंनी केली धमाल, लवकरच ठोठावतील भारतीय संघाचे दार)

नुकतच अभिनेत्री सयाली संजीवने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले होते ज्यांच्यावर रुतुराजने ‘Woahh️’ (वोआह) अशी कमेंट केली. रुतुराजने दिलेल्या कमेंटला प्रतिसाद देत सायलीने हार्टचा ईमोजी शेअर केला होता. यानंतर आणखी एका अभिनेत्रीने क्रिकेटपटूला क्लीन-बोल्ड केलं की काय अशा चर्चा सुरु झाल्या मात्र चेन्नई फलंदाजाने वेळ न घालवता त्वरित एक इन्टास्टोरी पोस्ट केली. ज्यामध्ये तो म्हणतो, “माझी विकेट फक्त बोलर्सच घेऊ शकतो आणि हो क्लिन बोल्डसुद्धा… कुणाचं काय तर कुणाचं काय”, असं कॅप्शन लिहिलेला एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये रुतुराजचा त्रिफळा उडाल्याचं दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

दरम्यान, सायलीने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते तर ती सध्या कलर्स मराठीवर 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येते. इतकंच नाही तर अभिनेत्रीने बर्‍याच मोठ्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सायली मराठी मनोरंज इंडस्ट्रीचा प्रख्यात चेहरा बनली आहे. दुसरीकडे, रुतुराजच्या यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर युवा सलामी फलंदाजाने चेन्नईच्या विजयी एक्सप्रेसमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. आयपीएलचा 14 वा हंगाम कोरोनामुळे स्थगित होण्यापूर्वी रुतुराजने 7 सामन्यात 196 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने दोन अर्धशतक देखील झळकावले.