ENG Vs IND: भारताच्या ऐतिहासिक कामगिरीवर क्रिकेटपटूंनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया
या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला 291 धावांची गरज होती. परंतु, भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या संघाला 210 धावापर्यंत मजल मारता आली.
ओव्हल मैदानात (Oval) इंग्लंड विरुद्ध खेळण्यात आलेल्या चौथ्या कसोटी (England Vs India) सामन्यात भारताने एतिहासिक कामगिरी केली आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला 291 धावांची गरज होती. परंतु, भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या संघाला 210 धावापर्यंत मजल मारता आली. ज्यामुळे भारतीय संघाने इंग्लंडवर 157 धावांनी मात केली आहे. या विजयानंतर पाच सामन्याच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ओव्हल मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केलेल्या भारतीय संघावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.
महत्वाचे म्हणजे, भारतीय संघाला गेल्या 50 वर्षात एकही कसोटी सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. भारताने ओव्हल मैदानात 1936 पासून 2018 पर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामन्यात भारताच्या हाती निराशा लागली होती. तर, या मैदानात 1971 साली खेळण्यात आलेल्या एकमेव सामन्यात भारताला विजय मिळाला होता. हे देखील वाचा- ICC WTC 2021-2023 Points Table: चौथ्या कसोटी विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला फायदा, गुणतालिकेत ‘विराटसेने’ने घेतली झेप; पाहा इंग्लंडची स्थिती
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. या सामन्यात उमेश यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा आणइ मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इग्लंडच्या संघाने गुडघे टेकले. या चौघांना यावेळी रवींद्र जडेजाचीही चांगली साथ मिळाली. शार्दुल ठाकूरने तर या सामन्यातील दोन्ही डावांत अर्धशतके झळकावली.