Cricketer Varun Chakravarthy Gets Married: KKR गोलंदाज वरुण चक्रवर्ती चढला बोहल्यावर, गर्लफ्रेंडशी चेन्नई येथे पार पडला विवाहसोहळा, पाहा Photos
इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) लेगस्पिनर वरुण चक्रवर्ती आपल्या गर्लफ्रेंडसोबत चेन्नई येथे लग्न बंधनात अडकला. चक्रवर्तीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी या क्रिकेटपटूचे आयुष्याच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवल्याबद्दल अभिनंदन केले.
इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) लेगस्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आपल्या गर्लफ्रेंडसोबत चेन्नई येथे लग्न बंधनात अडकला. चक्रवर्तीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी या क्रिकेटपटूचे आयुष्याच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवल्याबद्दल अभिनंदन केले. 29 वर्षीय गोलंदाज त्याच्या रहस्यमय गोलंदाजीच्या शैलीमुळे भारताच्या घरगुती सर्किटमध्ये चर्चेचा कारण बनला होता. तथापि, आयपीएल (IPL) 2020 मध्ये जगाने त्याचे सामर्थ्य पाहिले आणि केकेआरसाठी (KKR) त्याने 13 सामन्यांत 17 विकेट काढल्या, ज्या स्पिनरने घेतलेल्या तिसर्या सर्वाधिक विकेट होत्या. आयपीएलमधील प्रभावी कामगिरीमुळे वरुणची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-20 संघात निवड झाली मात्र, त्याला खांद्याच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. तथापि, आयपीएल 2020 मध्ये त्याच्या कामगिरीने त्या;या बरेच चाहते मिळवून दिले ज्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दरम्यान, चक्रवर्ती यांच्या विवाह सोहळ्यातील काही फोटो पाहा:
अरुण कार्तिकने चक्रवर्तीला शुभेच्छा दिल्या!!
View this post on Instagram
आणखी फोटो!
View this post on Instagram
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेमध्ये चक्रवर्तीच्या जागी टी नटराजनचा समावेश केला ज्याने कॅनबेरा सामन्यात डेब्यू करत तीनही सामने खेळले आणि सर्वाधिक 6 विकेट घेतल्या आणि भारताच्या 2-1ने मालिका विजयात मोलाची भूमिका बजावली. चक्रवर्ती आपल्या पहिली संधी गमावली असली तरी, तो अद्याप भारतात होणार्या 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या योजनांमध्ये आहे. आयपीएल 2021 जे मार्च महिन्यात होण्याची अपेक्षा आहे, चक्रवर्तीसाठी त्याला खूप महत्त्व आहे कारण प्रभावी कामगिरीमुळे राष्ट्रीय संघाचे द्वारे त्याच्यासाठी उघडतील.
(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2020 02:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

