Bigg Boss 12 : कठीण काळात श्रीसंतच्या मदतीला आला सचिन तेंडुलकर, आठवण सांगताना ढसाढसा रडला...
बिग बॉसच्या घरात सुद्धा त्याची वर्तवणूक चांगली नसून अनेक सदस्यांसोबत त्याचे भांडण झालेले प्रेक्षकांनी पाहिले आहे.
भारताचा पूर्व क्रिकेटर श्रीसंत सध्या प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉस १२ मध्ये स्पर्धक म्हणून उतरला आहे. IPL 2013 ला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याला भारतीय क्रिकेट बोर्डाने दोषी ठरवले आहे. म्हणून सध्या तो क्रिकेट पासून दूरच आहे. पण श्रीसंतने भारतासाठी अनेक महत्वपूर्ण सामने जिंकून दिले आहेत. २०११ विश्वचषक जिंकून देण्यात पण त्याचा महत्वाचा वाटा होता. बिग बॉसच्या घरात सह रहिवासी अनुप जलोटा यांच्याशी गप्पा मारताना त्याने सचिन तेंडूलकर बद्दल एक आठवण सांगितली आहे. ती आठवण सांगताना अर्थात तो भावूक झाला. नक्की वाचा: Bigg Boss 12 Exclusive : घरात पुन्हा 'वाईल्ड कार्डच्या रूपात प्रवेश करू शकेन : नेहा पेंडसे.
श्रीसंत म्हणतो, “विश्वचषक जिंकल्यानंतर एक दोन वर्षांनी एका मुलाखतीत सचिनला त्याच्या प्रत्येक सह खेळाडूबद्दल विचारण्यात आलं होतं. त्या प्रत्येक खेळाडूच्या योगदानाबद्दल सचिनला प्रश्न केला गेला होता. परंतु माझं नाव त्यातून वगळण्यात आलं होतं. पण सचिन यांनी त्या मुलाखतकाराला आवर्जून सांगितलं की विश्वचषक जिंकण्यात श्रीसंतची भूमिका पण महत्वाची होती. सचिनच्या या वाक्यामुळे मला खूप रडू आलं होतं”.
कलर्स वाहिनीने या संबंधी ट्वीट केले
श्रीसंत सह अंकित चवाण आणि अजित चंडीलाला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. हल्लीच श्रीसंतने इंग्लंड मध्ये कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी सर्वोच न्यायालयाची परवानगी मागितली होती. परंतु ती फेटाळण्यात आली होती. श्रीसंत या पूर्वीही अनेक वादात सापडला आहे. बिग बॉसच्या घरात सुद्धा त्याची वर्तवणूक चांगली नसून अनेक सदस्यांसोबत त्याचे भांडण झालेले प्रेक्षकांनी पाहिले आहे.