Cricket World Cup: 2023 वर्ल्ड कपनंतर ‘हे’ 5 युवा असू शकतात Team India कर्णधारपदाचे दावेदार, सुरु होणार विराट कोहलीच्या उत्तराधिकारीची रेस
परंतु, 2023 वर्ल्ड कप हा भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित आणि रहाणेसाठी कदाचित आयसीसीची अखेरची मोठी स्पर्धा सिद्ध होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की - भारताचा पुढचा कर्णधार कोण असेल?
Team India Protentional Captaincy Candidates: सी.के. नायडू ते अजिंक्य रहाणेपर्यंत आतापर्यंत कसोटी सामन्यात 33 आणि वनडेमध्ये 24 खेळाडूंनी टीम इंडियाचे (Team India) आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केले आहेत. भारतीय व्यवस्थापनातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे की विद्यमान कर्णधार निवृत्त होण्यापूर्वी पुढील कर्णधाराची तयारी सुरु होते. गांगुली निवृत्त होण्यापूर्वी धोनी जबाबदारी घेण्यासाठी तयार होता, तसेच धोनी निवृत्त होण्यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) देखील तयार होता आणि ही परंपरा अद्यापही कायम आहे. विराट कोहली सामन्यातील तीनही स्वरूपात संघाचे नेतृत्व करीत असताना भारत सध्या चांगलाच स्थिर आहे आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) व रहाणे त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित आहेत. परंतु, 2023 वर्ल्ड कप हा भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित आणि रहाणेसाठी कदाचित आयसीसीची अखेरची मोठी स्पर्धा सिद्ध होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की - भारताचा पुढचा कर्णधार (India Future Captain) कोण असेल? विराट कोहलीचा उत्तराधिकारी कोण असेल? याबाबत आपण 3 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे पुढे जाऊन कर्णधारपदाचे दावेदार बनू शकतात. (BCCI Central Contract List: टीम इंडियाच्या वार्षिक करारातुन ‘या’ खेळाडूंची झाली सुट्टी, 3 युवा खेळाडूंची करोडपती-क्लबमध्ये एंट्री)
1. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंतच्या प्रभावी नेतृत्वामुळे श्रेयस हा भारतीय कर्णधारपदाचा बहुधा संभाव्य पर्याय असेल आणि वर्ल्ड कप 2023 पर्यंत तो आणखी अनुभवही गोळा करेल. अय्यरने चौथ्या क्रमांकावर स्वत:चे स्थान निर्माण केले आहे आणि अलीकडच्या काळात तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता. अय्यरच्या नेतृत्वात 2019 आणि 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून संघ म्हणून बरेच यश मिळवले आहेत. 2023 विश्वचषकनंतर त्याच्या अनुकूलतेमुळे तो कर्णधारपदी सर्वोत्कृष्ट निवड असल्याचं दिसत आहे.
2. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)
नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्याच्या फलंदाजीच्या सततच्या धावसंख्येचा नक्कीच विचार करत लवकरच तो भारतीय वनडे संघात प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे. पृथ्वी शॉने यापूर्वी आपल्या अंडर-19 संघाचे नेतृत्व केले आहे. आपल्या उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर त्याने मुंबईला विजय मिळवून दिला आणि कर्णधाराच्या भूमिकेत अगदी प्रभावी ठरला आहे. भारतीय वनडे संघाचा नियमित सदस्य झाल्यास 2023 वर्ल्ड कपनंतर तो कर्णधारपदासाठी दावेदार ठरू शकतो.
3. केएल राहुल (KL Rahul)
विराट आणि रोहितनंतर भारतीय संघातील सर्वात ज्येष्ठ खेळाडू राहुल आहेत जो तीनही फॉरमॅटमध्ये खेळतो. तो शांत आणि मैदानावर स्थिरावलेला आहे व जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्याच्या खेळाडूंना पाठिंबा देतो. खेळाविषयी त्याची समज चांगली आहे आणि खेळातील सद्य स्थितीबद्दल काय निर्णय घ्यावे हे त्याला माहित आहे.न्यूझीलंडविरुद्ध 2020 पाचव्या टी-20 सामन्यात प्रभारी कर्णधार रोहित दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्यावर राहुलकडे जबाबदार देण्यात आली होती. त्याने संघासाठी सहज सामना जिंकला आणि कर्णधारपदाच्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले.
4. रिषभ पंत (Rishabh Pant)
टीम इंडियाचा युवा विकेटकीपर-फलंदाज पंतने कसोटी क्रिकेटसह मर्यादित ओव्हरच्या भारतीय संघात आपले स्थान मजबूत केले आहे. पंतला आयपीएलमध्ये पहिल्यांदा यंदा दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी नेतृत्वाची जबादारी देण्यात आली. मात्र, आयपीएल वगळता पंतने यापूर्वी 2017 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण केले होते. इतकंच नाही तर कर्णधारपदी असताना हिमाचल प्रदेश विरोधात 2017–18 झोनल टी-20 सामन्यात पंतने टी-20 सामन्यात 32 चेंडूत दुसरे वेगवान शतक ठोकत आपले कौशल्य दाखवले होते. त्यामुळे, आगामी काळात पंतला भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाली तर चकित होऊ नका.
5. शुभमन गिल (Shubman Gill)
गिल भारतासाठी कसोटी क्रिकेट संघाचा नियमित सदस्य बनला आहे आणि वनडे संघात देखील तो स्थिरावण्यासाठी प्रयत्नशील असेल. 2018 अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेतून तो पहिल्यांदा जगासमोर आला आणि स्पर्धेत संघाचा सर्वोच्च धावा करणारा म्हणून त्याने कामगिरी बजावली. 2023 विश्वचषकानंतर भारताचे नेतृत्व करणाऱ्यासाठी वर दिलेल्या नावांपैकी तो नक्कीच एक दावेदार असेल.