Cricket History: क्रिकेट इतिहासातील हे जबरदस्त रेकॉर्डस् तोडणं आहे कठीण

क्रिकेट सामन्यात आज एका सामन्यात अनेक विक्रम मोडले जातात तर काही नवीन रेकॉर्ड्सची नोंद केली जाते. आज आपण अशा 11 रेकॉर्डबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना मोडणं कठीण मानलं जातं.

प्रतिनिधित्व फोटो (Photo Credit: PixaBay)

क्रिकेटमध्ये (Cricket) बर्‍याचदा असे म्हटले जाते की येथे रेकॉर्ड फक्त खंडित करण्यासाठी बनले जातात. जर कोणताही फलंदाज किंवा गोलंदाज विक्रम करत नसेल तर इतर खेळाडूंनी तो विक्रम मोडीत काढण्यास आवडेल. क्रिकेटचा इतिहास अनेक वर्ष जुना आहे. कसोटी क्रिकेटपासून सुरु झालेला खेळ आज वनडे आणि टी-20 स्वरूपापर्यंत येऊन पोहचला आहे. कसोटी क्रिकेट हा यथार्थपणे खेळाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे आणि 1877 मध्ये त्याच्या स्थापनेपासून ते कायम आहे. क्रिकेट सामन्यात आज एका सामन्यात अनेक विक्रम मोडले जातात तर काही नवीन रेकॉर्ड्सची नोंद केली जाते. आज आपण अशा 11 रेकॉर्डबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना मोडणं कठीण मानलं जातं. (आंतरराष्ट्रीय निवृत्तीपूर्वी ‘या’ 5 दिग्गज क्रिकेटपटूंना नाही मिळाला निरोप सामना, दोन वर्ल्ड कप विजेता कर्णधाराचाही यादीत समावेश)

सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) 100 आंतरराष्ट्रीय शतके

सचिनला जगातील महान फलंदाजांपैकी एक मानले जाते. सचिनच्या नावावर 100 आंतरराष्ट्रीय शतके आहेत आणि त्याचा हा विक्रम मोडणेही फार कठीण आहे. पण, जर कोणी फलंदाजाने त्याचा रेकॉर्ड मोडला तर तो यादीत दुसऱ्या  राहिलं.

सर डॉन ब्रॅडमनची सरासरी 99.94

ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होते. क्रिकेट चाहत्यांमध्ये ते नेहमीच त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीसाठी लक्षात राहतील, जी 52 कसोटी सामन्यांमध्ये 99.94 आहे. त्यांच्या या सरासरीच्या जवळ येणेही फलंदाजांसाठी खूप कठीण दिसत आहे त्यामुळे ब्रॅडमनचा हा रेकॉर्ड मोडणे कठीणच नाही तर अशक्य आहे.

श्रीलंकेच्या एकूण 952 धावा

1997 कोलंबोमध्ये (Colombo) भारताविरुद्ध 952 एकूण धावसंख्येचा रेकॉर्ड श्रीलंका (Sri Lanka) संघाच्या नावावर आहे. यामध्ये रोशन महानमाच्या 225 धावा, अरविंदा डी सिल्वाचे शतक आणि अर्जुन रणतुंगा व महेला जयवर्धने यांची अर्धशतकी खेळीचा समावेश होता.

ब्रायन लाराच्या 400 धावा

वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara) इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करत 400 धावांचा विक्रम नोंदविला होता. कसोटी क्रिकेटमध्ये लाराने त्याच्या नावावर बरेच मोठे विक्रम नोंदवले आहेत, परंतु हा विक्रम त्यापैकी सर्वात विशेष आहे. लाराच्या विक्रमी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने 202 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 751 धावांचा डोंगर उभारला.

सर्वात मोठा कसोटी सामना

क्रिकेट इतिहासातील हा सर्वात विलक्षण विक्रम आहे. जो मोडणे फक्त कठीणच नाही तर आता पुन्हा खेळला जाणे अशक्य आहे. हा सामना 1939 डरबन येथे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघात रंगला होता. 3 मार्च ते 14 मार्च या कालावधीत हा सर्वात मोठा कसोटी सामना खेळला गेला होता.

सर्वात मोठी ओव्हर

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सामीने (Mohammed Sami) बांग्लादेश विरोधात एकदिवसीय सामन्यात 17 चेंडूंची सर्वाधिक मोठी ओव्हर फेली होती. त्याने सात वाइड आणि 4 नो बॉल टाकले व त्यात 22 धावा दिल्या होत्या. क्रिकेटच्या मैदानावरील या विक्रमाची पुन्हा कोणी गोलंदाज पुरावृत्ती करू इच्छित नसेल.

मुथय्या मुरलीधरनच्या विकेट्स

जगातील महान फिरकीपटूंमध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचे नाव आघाडीवर येते. मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यात सर्वाधिक 800 गडी आणि 350 वनडे सामन्यात 534 विकेट्स अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1347 विकेट्स घेतलेल्या आहेत. मुरलीधरनचा हा रेकॉर्ड मोडणे गोलंदाजासाठी नक्कीच आव्हानात्मक ठरेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif