Coronavirus: लॉकडाउन दरम्यान मुंबई फलंदाज सरफराज खान प्रवासी मजुरांना करतोय फूड पॅकेटचे वाटप, ईद ही नाही करणार साजरी

मुंबईकडून खेळणारा उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू सरफराज खानदेखील बाहेरून यूपीला येणाऱ्या स्थलांतरित मजुरांना फूड पॅकेट वाटण्याच्या कामात सामील झाला आहे. हा खेळाडू रमजानच्या पाक महिन्यात वडील आणि भावासोबत लोकांना मदत करताना दिसला.

सरफराज खान (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirs) महामारीमुळे सध्या देशात लॉकडाउन (Lockdown) आहे ज्याचा परिणाम स्थलांतरित मजुरांवर (Migrant Laboureres) मोठ्या प्रमाणात झाला आहे. ते सध्या आपल्या घरी पोहण्याचा जीवघेणा प्रवास करत आहे. कोरोना विषाणूच्या काळात कामगारांना मदत करण्यासाठी प्रत्येकजण पुढाकार घेत आहे. मुंबईकडून खेळणारा उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू सरफराज खानदेखील (Sarfaraz Khan) बाहेरून यूपीला येणाऱ्या स्थलांतरित मजुरांना फूड पॅकेट वाटण्याच्या कामात सामील झाला आहे. हा खेळाडू रमजानच्या पाक महिन्यात वडील आणि भावासोबत लोकांना मदत करताना दिसला. कोरोना विषाणूंमधील नोकरी गमावल्यामुळे स्थलांतरित कामगार आपापल्या घरी परतत आहेत. अशा स्थितीत त्यांना वाटेत खाण्या-पिण्याचा संकटाला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच सरफराजने शेकडो लोकांना अन्न वाटप करून मदत केली. या रणजी ट्रॉफी मोसमात मुंबईकडून तिहेरी शतक ठोकणारा सरफराजआजमगढचा रहिवाशी आहे आणि येथे तो भाऊ आणि वडिलांसोबत मजुरांची फूड पाकिटांचे वाटप करीत आहे. (Lockdown: स्थलांतरित मजूरांच्या मदतीस भारतीय क्रिकेटपटू उतरला रस्त्यावर; मित्र, शेजारी आणि पोलिसांच्या मदतीने कामगारांना करतोय अन्न-पाण्याचे वाटप)

अत्यंत गरीबीने ग्रस्त, लक्षावधी लोक कुपोषण, उपासमार आणि तीव्र उष्णता आणि थकवा यांच्याशी झुंज देत आपल्या घराकडे पायपीट करत आहेत. सोशल मीडियावरसरफराजचा फूड पाकिटं देतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.सरफराजच्या या उदात्त कामगिरीचे यूजर्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. काहींनी फलंदाजाला खरा नायक म्हणून संबोधत सरफराजची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली. आउटलुक इंडियाच्या अहवालानुसार सरफराज म्हणाला, "जेव्हा आम्ही बाजाराला जात असे तेव्हा आम्हाला हजारो लोकं रस्त्यावर प्रवास करताना दिसले आणि म्हणूनच आम्ही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. आमच्या वडिलांची कल्पना होती की आम्हाला प्रवासी कामगारांना मदत करावी." प्रवासी कामगारांना होणार त्रास पाहता सरफराजने यंदा ईदही साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हीही पाहा सरफराजचा हा व्हिडिओ:

एका वापरकर्त्याने कौतुक लिहिले - सरफराज तू कमाल आहेस. आपण जे केले त्यास कामगारांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे.

दुसर्‍या यूजरने लिहिले- कोहलीचा आवडता सरफराजने एक नवीन आव्हान स्वीकारले आहे. तो प्रवासी कामगारांमध्ये अन्न आणि पाणी वाटप करीत आहेत. अप्रतिम.

तथापि, परप्रवासी कामगारांच्या दुर्दशामुळे सरफराज हा पहिला खेळाडू नाही. यापूर्वी अष्टपैलू तजिंदर सिंह ढिल्लों आपल्या गावी जाणाऱ्या 10000 हून अधिक अन्न आणि पाणी वाटप करत आहे.प्रवाशांना भाजी आणि चपाती बनवण्यासाठी तजिंदरला इतरांनीही बटाटे आणि पीठ उपलब्ध करून मदत केली.