Coronavirus: हँडशेक्स किंवा हाय-फाइव्हज नाही, क्रिकेटमध्ये कोविडनंतरच्या सेलिब्रेशनची जेम्स अँडरसनने दाखवली पहिली झलक, पाहा Video

सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे पुनरागमन मुख्य चर्चा केंद्र ठरली असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याने ज्या प्रकारे विकेट्स साजऱ्या केल्या तो लक्षवेधी क्षण ठरला. तेथे संघात हँडशेक्स किंवा हाय-फाइव्हज नव्हते कारण अँडरसनने आपल्या साथीदारांसह विकेट्स साजरा करताना योग्य शारीरिक अंतर आहे याची खात्री केली.

जेम्स अँडरसन (Photo Credit: Twitter/@englandcricket)

तब्बल अडीच महिन्यापासून ठप्प झालेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता पुन्हा सुरु होण्यासाठी सज्ज आहे. 8 जुलैपासून एजियास बाउल, साऊथॅम्प्टन येथे इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिज (West Indies) दरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. पोस्ट-कोरोना व्हायरसचा हा पहिला आंतराष्ट्रीय सामना असेल. टीव्हीवरील पडद्यावर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा लाइव्ह-अ‍ॅक्शन पाहायला मिळेल, पण कोरोनानंतर हा खेळ पूर्वीसारखा होणार नाही. याची एक झलक बुधवारी एजियास बोलमध्ये टीम बटलर आणि टीम स्टोक्स यांच्यात 3 दिवसीय इंट्रा-स्क्वॉड सराव सामन्याच्या उद्घाटनाच्या दिवशी पाहायला मिळाली.  सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) ऍक्शनमध्ये दिसला. त्याने टीम स्टोक्ससाठी जास्तीत जास्त ओव्हर टाकली. अँडरसनने प्रत्येक ओव्हरयामध्ये 3 पेक्षा कमी धावा देत दोन विकेट्स घेतल्या आणि सर्वांचे लक्ष वेधले. अ‍ॅन्डरसनचे पुनरागमन मुख्य चर्चा केंद्र ठरली असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याने ज्या प्रकारे विकेट्स साजऱ्या केल्या तो लक्षवेधी क्षण ठरला. (एमएस धोनीच्या 'बालिदान बॅज' ग्लोव्हजवर आक्षेप… पण ‘Black Lives Matter’ चालेल; वेस्ट इंडिज खेळाडूंच्या जर्सीवर ICC वर संतापले नेटकरी)

तेथे संघात हँडशेक्स किंवा हाय-फाइव्हज नव्हते कारण अँडरसनने आपल्या साथीदारांसह विकेट्स साजरा करताना योग्य शारीरिक अंतर आहे याची खात्री केली. अँडरसनने आपल्या कोमचा उपयोग आपल्या सहकाऱ्यांना स्पर्श न करता साजरी केली. इंग्लंड क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये यष्टीरक्षक बेन फोक्सने सवयीनुसार हाय-फाइव्हसाठी हात उंचावला, पणअँडरसनने नियमानुसार कोपर स्पर्श करून विकेट साजरी केली. सराव सामन्याच्या काही ओव्हर दरम्यान इंग्लंडचा गोलंदाज अनेकदा सॅनिटायझर वापरताना दिसला. इतकचं नाही तर, मैदानावर ड्रिंक्स घेऊन येणारे पर्यायी खेळाडूनेही ग्लोव्हस घातले होते.

ते वेगळे आहे, पण परत आले आहे

इंग्लंडच्या खेळाडूंनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खेळाच्या सुरक्षित पुनरागमनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जावे याची खात्री केली. दरम्यान, क्रिकेटपटूंना या व्हायरसची लागण होण्याचा धोका कमी करण्यासाठी बॉल चमकवण्यासाठी लाळ वापरण्यावर बंदी घातली गेली असताना हा पहिला अंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now