Coronavirus: गौतम गंभीर याने कोरोनामुळे निधन झालेल्या दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल अमित कुमारच्या कुटुंबासाठी पुढे केला मदतीचा हात, वाचा सविस्तर

अलीकडेच कोरोना व्हायरसच्या लढाईत पराभूत झालेल्या 31 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल अमित कुमारच्या कुटूंबासाठी गंभीरने मदतीचा हात पुढे केला आहे. अमित यांच्या निधनानंतर गंभीरने त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं सांगितलं.

गौतम गंभीर (Photo Credit: IANS)

गौतम गंभीर,(Gautam Gambhir) भारताने आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. 2018 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या गंभीरने राजकारणी म्हणून आता दुसर्‍या डावात प्रवेश केला आहे. पूर्व दिल्लीचे (Delhi) खासदार असलेले गंभीरने आपल्या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून लोकसभा 2019 ची निवडणूक जिंकली. गंभीर त्याच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध आहे आणि वेळोवेळी त्याने आपल्या उदात्त जेस्चरसह हे सिद्ध केले आहे. गंभीरने पुन्हा एकदा एक असे कृत्य केले आहे ज्यामुळे प्रत्येकाचा मानवतेवरील विश्वास अजून मजबूत होईल. अलीकडेच कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) लढाईत पराभूत झालेल्या 31 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल अमित कुमारच्या कुटूंबासाठी गंभीरने मदतीचा हात पुढे केला आहे. बुधवारी दुपारी अमितकुमार यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली. आणि एक दिवसानंतर अमित यांना आपले प्राण गमवावे लागले. दिल्ली पोलिस (Delhi Police) कॉन्स्टेबलच्या या बलिदानाला सलामी देत गंभीरने त्याच्या कुटुंबाची जबाबदारी उचलली आहे. (दारूच्या दुकानासमोरील गर्दी पाहून भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू गौतम गंभीर भडकले; पाहा काय म्हणाले?)

अमित यांच्या निधनानंतर गंभीरने त्यांना श्रद्धांजलीच वाहिली नाही तर त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गंभीरने ट्विटरवर लिहिले की,"प्रशासन, यंत्रणा, दिल्ली अपयशी ठरली. आम्ही कॉन्स्टेबल अमितला परत आणू शकत नाही, पण मी खात्री देतो की मी माझ्या मुलाप्रमाणेच त्याच्या मुलाची देखभाल करीन. जीजीएफ त्याच्या संपूर्ण शिक्षणाची काळजी घेईल. पाहा हे ट्विट:

गंभीरने उदात्त कार्य करण्याची ही पहिली वेळ नाही. अलीकडेच गंभीरने निधन झालेल्या आपल्या घरी काम करणाऱ्या मोलकर्णीवर स्वतः अंत्यसंस्कार केले होते. लॉकडाउनमुळे तिला तिच्या घरी पोहचवणे अशक्य असल्याने गंभीरने स्वतःहून हे मोठे कार्य केले. तिच्यावर अंत्यसंस्कार करणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे गंभीर म्हणाला. तो म्हणाला की जाती, धर्म, धर्म किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा विचार न करता त्याचा नेहमीच सन्मानावर विश्वास आहे. उत्तम समाज घडविण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचा गंभीर म्हणाला. शिवाय, लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्यांना त्याने अन्न वाटपही केले. प्रधानमंत्री सहायतामध्ये त्याने दोन वर्षाचा पगारही दान करण्याचा निर्णय घेतला आणि गंभीर फाउंडेशनकडून फ्री PPE मास्कही वाटले.