Coronavirus: वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी डेविड वॉर्नरने केले मुंडन; स्टिव्ह स्मिथ, विराट कोहली यांनाही केले आव्हान (Video)

डोकं मुंडल्यावर वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचा सहकारी स्टीव्ह स्मिथ आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीलाही असेच आव्हान दिले.

डेविड वॉर्नर (Photo Credit: Instagram/Video Grab)

ऑस्ट्रेलियन (Australia) क्रिकेट संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने (David Warner) मंगळवारी डोकं मुंडविण्याचा निर्णय घेतला. वॉर्नरने कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) मजबूतपणे लढत असलेल्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी असे केले आहे. डोकं मुंडल्यावर वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचा सहकारी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीलाही (Virat Kohli) असेच आव्हान दिले. वॉर्नरने याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केले. कोरोना व्हायरस जागतिक महामारीने ऑस्ट्रेलियामध्ये मृतांची संख्या 19 वर पोचली आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत कोविड-19 (COVID-19) पासून त्रस्त लोकांची संख्या 4460 वर पोहोचली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च रोजी या आजाराला जागतिक साथीचा रोग जाहीर केला. (COVID-19 लॉकडाऊनमुळे घरी बसलेला डेविड वॉर्नर झाला बोअर, भारतीय यूजर्स म्हणाले 'रामायण', 'महाभारत' बघ, पाहा Tweets)

व्हिडिओ शेअर करताना वॉर्नरने कॅप्शनमध्ये लिहिले, "कोरोना विरुद्ध अग्रभागी उभे राहून आमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना आधार देण्यासाठी माझं डोकं मुंडण करण्यासाठी मला आव्हान केले गेले. मला आठवते मी शेवटच्या वेळेस हे केले होते तेव्हापासून माझे पदार्पण झाले होते. आपल्याला आवडले की नाही?" स्मिथ आणि विराटऐवजी वॉर्नरने पॅट कमिन्स, जो बर्न्स, ट्रॅव्हिस स्मिथ, पियर्स मॉर्गन, एडम जम्पा आणि मार्कस स्टोइनिस यांनीही आव्हान केले. वॉर्नरने व्हिडिओ शेअर केल्यावर आणि विराटला चॅलेंज दिल्यावर सोशल मीडियावर 'किंग कोहली'ची खिल्ली उडवली जात आहे. पाहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Been nominated to shave my head in support of those working on the frontline #Covid-19 here is a time lapse. I think my debut was the last time I recall I’ve done this. Like it or not??

A post shared by David Warner (@davidwarner31) on

वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना विचारले होते की या कंटाळवाणा काळात त्यांनी काय करावे? वॉर्नरने ट्विट केले की, "घरी काय करावे, माझ्याकडे आता कल्पना संपल्या आहेत." यावर भारतीय चाहत्यांनी त्याला 'रामायण', 'महाभारत' बघण्याचा सल्ला दिला, तर काहींनी त्याला तेलगू भाषा शिकण्यास सांगितले. वॉर्नर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद कडून खेळतो आणि नुकताच त्याला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.