Coronavirus: पाकिस्तानचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर जफर सरफराज यांचे निधन, देशात संक्रमितांची संख्या पाच हजार पार
ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, 50 वर्षीय सरफराज गेल्या तीन दिवसांपासून पेशावरमधील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर होते. कोविड-19 मुळे मृत्यू झालेले सरफराज हे पाकिस्तानचे पहिले व्यावसायिक क्रिकेटपटू ठरले.
पाकिस्तानचे (Pakistan) माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू जफर सरफराज (Zafar Sarfraz) यांचे कोविड-19 (COVID-19) चाचणी सकारात्मक आल्यानंतर निधन झाले आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, 50 वर्षीय सरफराज गेल्या तीन दिवसांपासून पेशावरमधील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर होते. कोविड-19 मुळे मृत्यू झालेले सरफराज हे पाकिस्तानचे पहिले व्यावसायिक क्रिकेटपटू ठरले. 1988 मध्ये सरफराजने पदार्पण केले होते आणि पेशावरकडून (Peshawar) 15 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने 616 धावा केल्या. त्यांनी 6 आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात 96 धावा केल्या. 1994 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी पेशावरमधील सिनिअर आणि अंडर-19 संघांचे प्रशिक्षकही केले. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये कोविडची एकूण 5500 प्रकरणे आहेत आणि यापैकी 744 खैबर पख्तूनख्वामध्ये आहेत. (कोरोना व्हायरसमुळे क्रीडा जगात शोककळा, COVID-19 ची लागण झालेल्या माजी आफ्रिकन फुटबॉलपटू मोहम्मद फराह यांचे निधन)
जफर हा पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अख्तर सरफ्रझचा भाऊ होता. अख्तरचे 10 महिन्यांपूर्वी त्याच शहरात कोलन कर्करोगाशी लढाई नंतर निधन झाले होते. खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या उत्तरेकडील पेशावर शहरात जवळपास 5500 सक्रिय घटनांपैकी 744 रुग्ण आहेत. जफर सरफराज यांच्या मृत्यूची बातमी पाकिस्तानच्या मीडिया आणि तेथील वृत्तसंस्थांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानी मीडियाच्या अहवालानुसार पंजाब प्रांतामध्ये कोरोना विषाणूचे 2,656 रुग्ण, सिंधमध्ये 1,452, खैबर-पख्तूनख्वा येथे 744 आणि बलुचिस्तानमध्ये 231 रुग्ण आढळले आहेत. सोमवारी, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कमीतकमी 20 डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि राज्यात या धोकादायक विषाणूची लागण झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 50 वर पोहचली आहे. पाकिस्तानच्या वैद्यकीय संघटनेने म्हटले की आजवर देशात 100 हून अधिक डॉक्टर, परिचारिका आदींना या विषाणूची लागण झाली आहे.