Chris Gayle: सिक्सर मशीन ख्रिस गेल संघाबाहेर? संजय मांजरेकर यांनी तयार केला पंजाब किंग्जचा प्लेइंग इलेव्हन संघ

या हंगामातील चौथा सामना पंजाब किंग्ज (Panjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आज (12 एप्रिल) मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium Mumbai) खेळला जाणार आहे.

क्रिस गेल (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) आतापर्यंत 3 सामने पार पडले आहेत. या हंगामातील चौथा सामना पंजाब किंग्ज (Panjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आज (12 एप्रिल) मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium Mumbai) खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ आपल्या जबरदस्त खेळाडूंसह मैदानात उतरणार आहेत. यातच माजी क्रिकेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी तयार केलेल्या पंजाब किंग्जच्या प्लेइंग इलेव्हन बघून ख्रिस गेलचे नाव वगळले आहे. संजय मांजरेकर यांनी ख्रिस गेलला संघातून का वगळले आहे? याचा पंजाब किंग्जच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या कार्यक्रमात माजी भारतीय फलंदाज मांजरेकर यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी पंजाब किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनची तयारी केली आहे. यात त्याने ख्रिस गेलऐवजी इंग्लंडच्या डेव्हिड मालनचा समावेश केला आहे. हे देखील वाचा-IPL 2021: आयपीएलच्या चौदाव्या हंगामात 'या' भारतीय खेळाडूंनी गाजवले मैदान; पाहा मेन ऑफ द मॅच मिळवलेल्या क्रिकेटपटूंची यादी

ट्वीट-

संजय मांजरेकर यांना तयार केलल्या पंजाब किंग्ज संघाच्या यादीत केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, डेव्हिड मलान, सरफराज खान, निकोलस पूरन, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, झाय रिचर्डसन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी और रवि बिश्नोई यांचा समावेश केला आहे.