आचरेकर यांच्या निधनामुळे उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला : मुख्यमंत्री
ते 87 वर्षांचे होते. मुंबईच्या दादर परिसरातील शिवाजी पार्क परिसरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते वृद्धापकाळातील अनेक व्यादींनी त्रस्त होते
ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवान्वित झालेल्या आचरेकरसरांचे क्रिकेट प्रशिक्षणातील योगदान असामान्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आचरेकर यांना वाहिलेल्या श्रद्धांजली मुख्यमंत्री पुढे म्हणतात, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या महान खेळाडूसोबत चंद्रकांत पंडीत, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे आदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना घडविण्यात आचरेकरसरांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी घडविलेल्या अनेक खेळाडूंनी उत्तम प्रशिक्षक म्हणूनही कारकीर्द घडविली आहे. पुस्तकी तंत्रापेक्षा खेळाडूच्या नैसर्गिक गुणांना पैलू पाडण्याचे त्यांचे तंत्र विशेष होते. (हेही वाचा, सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे निधन)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचे गुरु रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar ) यांचे निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. मुंबईच्या दादर परिसरातील शिवाजी पार्क परिसरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते वृद्धापकाळातील अनेक व्यादींनी त्रस्त होते