IND vs WI Test Series 2023: कसोटी संघातून वगळलेला चेतेश्वर पुजारा देशांतर्गत क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन, 'या' स्पर्धेत होणार सहभागी

दरम्यान, वृत्तानुसार चेतेश्वर पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटच्या मार्गावर परतणार आहे. खरं तर, 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार पुजारा 28 जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकडून खेळणार आहे.

Cheteshwar Pujara (Photo Credit - Twitter)

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) संघ जाहीर केला आहे. एकीकडे भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पुजारा भारतीय संघात केव्हा पुनरागमन करेल याबाबतची परिस्थिती स्पष्ट नाही. दरम्यान, वृत्तानुसार चेतेश्वर पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटच्या मार्गावर परतणार आहे. खरं तर, 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार पुजारा 28 जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकडून खेळणार आहे. (हे देखील वाचा: IND vs WI Series 2023: वेस्ट इंडिज दौऱ्यावर 'हे' चार खेळाडू टीम इंडियासाठी करू शकतात पदार्पण, रोहित शर्मा कोणाल देणार संधी)

पुजारा जिंकू शकतो संघ व्यवस्थापनाचा विश्वास

“निवडकर्ते आणि प्रशिक्षक (राहुल द्रविड) यांना जयस्वाल आणि गायकवाड सारख्या तरुणांना आजमावायचे होते, त्यामुळेच पुजाराला या दौऱ्यासाठी निवडण्यात आले नाही. जर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा केल्या तर त्याच्यासाठी दरवाजे बंद होत नाहीत, असे त्याला सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत पुजारा दुलीप ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करून संघ व्यवस्थापनाचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू शकतो.

पुजाराचा कसोटी विक्रम

पुजारा भारतासाठी 100 हून अधिक कसोटी खेळणारा १२वा खेळाडू आहे. त्याने 103 कसोटी सामन्यांच्या 176 डावात 43.60 च्या सरासरीने आणि 44.36 च्या स्ट्राईक रेटने 7,195 धावा केल्या आहेत.त्याने कसोटीत 35 अर्धशतके आणि 19 शतके झळकावली आहेत. नाबाद 206 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र, तो बऱ्याच दिवसांपासून फॉर्ममध्ये आहे. 2019 पासून त्याने फक्त एक शतक झळकावले आहे. तेही 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध. याशिवाय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही तो विशेष काही करू शकला नाही.