WTC 2023-25 Points Table: सेंच्युरियन कसोटीतील पराभवामुळे भारताचे मोठे नुकसान, डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये बांगलादेशच्या खाली
दुसऱ्या डावात फक्त विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅटची ताकद दिसली.
IND vs SA 1st Test: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिकेत 31 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहणार आहे. यावेळी टीम इंडियाला (Team India) या दौऱ्यावरील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाच्या फलंदाजांनी दोन्ही डावातील कामगिरीने निराश केले, त्यात केएल राहुल (KL Rahul) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला पहिल्या डावात विशेष काही करता आले नाही. दुसऱ्या डावात फक्त विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅटची ताकद दिसली. आता या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा पराभव पत्करावा लागला आहे.
पराभवासह गमवावे लागले पहिले स्थान
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होता. सेंच्युरियन कसोटीतील पराभवानंतर आता टीम इंडिया थेट पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. भारतीय संघाचे 16 गुण असले तरी त्यांच्या गुणांची टक्केवारी आता 44.44 वर पोहोचली आहे. आता भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या आवृत्तीत तीन कसोटी सामने खेळला आहे, ज्यामध्ये एक जिंकला, एक हरला आणि एक सामना अनिर्णित राहिला. भारताचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेने 100 गुणांच्या टक्केवारीसह या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. (हे देखील वाचा: South Africa Beat India: सेंच्युरियन कसोटीत भारताचा लाजीरवाणा पराभव, 'ही' आहेत पाच मोठी कारणे)
पाकिस्तान दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया सहाव्या स्थानावर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2023-25 आवृत्तीच्या पॉइंट टेबलमधील इतर संघांच्या स्थानावर नजर टाकली तर पाकिस्तानचा संघ सध्या 61.11 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा संघ 41.67 गुणांच्या टक्केवारीसह सहाव्या स्थानावर भारतापेक्षा एक स्थान खाली आहे.