वापरलेल्या गाड्यांपासून Drone बनवणाऱ्या कंपनीपर्यंत, ‘कॅप्टन’ MS Dhoni ‘या’ 7 व्यवसायांतून करतो बंपर कमाई

त्याच्या 26 शहरांमध्ये 300 हून अधिक ड्रोन आणि 500 ​​पायलट कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कंपनीच्या ड्रोन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले.

एमएस धोनी (Photo Credit: Twitter/ChennaiIPL)

MS Dhoni Income Source: अनुभवी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) अलीकडेच ड्रोन स्टार्टअप (Drone Start-Up) गरुड एरोस्पेसमध्ये भाग घेतला आहे. त्याच्या 26 शहरांमध्ये 300 हून अधिक ड्रोन आणि 500 ​​पायलट कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कंपनीच्या ड्रोन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले. कंपनीने धोनीला ब्रँड अॅम्बेसेडरही बनवले आहे. धोनी म्हणाला, “गरुडा एरोस्पेसचा एक भाग बनून मला आनंद होत आहे आणि त्यांनी ऑफर केलेल्या अनोख्या ड्रोन सोल्यूशन्ससह त्यांची वाढ पाहण्यास उत्सुक आहे.” गरुडा एरोस्पेस व्यतिरिक्त, धोनीने इतर अनेक कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. अशाच काही कंपन्यांवर एक नजर टाकूया. धोनीने 2019 विश्वचषक दरम्यान अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला तर 2020 आयपीएलच्या वेळीस निवृत्तीची घोषणा केली. (Team India: धोनी-कोहलीने दुर्लक्ष केल्याने ‘या’ 4 स्टार भारतीय क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीवर ब्रेक!)

खाताबुक

Khatabook लाँच झाल्यानंतर अल्पावधीतच 5 कोटींहून अधिक व्यापारी त्याच्याशी जोडले गेले. धोनीने 2020 मध्ये आपल्या एका वक्तव्यात म्हटले होते की खतबुक जमिन पातळीवर बदल घडवून आणण्यास सक्षम आहे.

7 इंक ब्रूस

ही एक खाद्य आणि पेय कंपनी आहे. या कंपनीचा शेअरहोल्डर असण्यासोबतच धोनी ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. कंपनीने गेल्या वर्षी कॉप्टर 7 या ब्रँड नावाखाली चॉकलेट आणि शीतपेयांची सिरीज सुरू केली. धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट आणि जर्सी नंबरवरून हे नाव पडले आहे.

कार 24

धोनीने 2019 मध्ये या कंपनीत गुंतवणूक केली होती. ही कंपनी 2015 मध्ये सुरू झाली आणि वापरलेल्या कारच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करते.

होमलेन

घरांच्या इंटिरिअर डिझायनिंगच्या कामात गुंतलेली ही कंपनी आहे. धोनीने 2021 मध्ये या कंपनीत गुंतवणूक केली होती. ही कंपनी 2014 मध्ये सुरू झाली.

हॉटेल माही रेसिडेन्सी

धोनी झारखंडच्या रांची येथील हॉटेल माही रेसिडेन्सीचा मालक असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. धोनीचे हे गाव आहे. या हॉटेलमध्ये कोणतीही फ्रेंचायझी नाही.

स्पोर्ट्सफिट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड

या कंपनीची मालकी धोनीकडे आहे. ही कंपनी भारतभर 200 हून अधिक जिम चालवते जी स्पोर्ट्सफिट वर्ल्ड नावाने चालवली जाते.