Smriti Mandhana Half Century: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही स्मृती मंधानाचे अर्धशतक, प्रतिका रावलची ही 76 धावांची खेळी

दुसऱ्या सामन्याची भारताची सुरुवात देखील आक्रमक झाली. मंधानाने 47 चेंडूत 53 धावा करुन बाद झाली. आपल्या या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. तर प्रतिका रावलने देखील 86 चेंडूत 76 धावा करुन सध्या क्रिजवर आहे.

Smriti Mandhana Half Century: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही स्मृती मंधानाचे अर्धशतक, प्रतिका रावलची ही 76 धावांची खेळी
Smriti Mandhana (Photo Credit - X)

India Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team 2nd ODI 2024:   भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना मंगळवार, 24 डिसेंबर रोजी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला भारतीय सलामिवीर स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी योग्य ठरवत पहिल्या विकेटसाठी शतकीय भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधानाने आज देखील आक्रमक सुरुवात केली. पंरतू 53 धावांवर ती धावबाद झाली. तर प्रतिका रावल संध्या 68 धावांवर त असून भारताची धावसंख्या 29 ओव्हर नंतर 1 बाद 173 अशी झाली आहे.  (हेही वाचा -  IND W Beat WI W, 1st ODI Match 2024: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिंजवर 211 धावांनी मोठा विजय, रेणुका ठाकूरच्या 5 विकेट )

दरम्यान दुसऱ्या सामन्याची भारताची सुरुवात देखील आक्रमक झाली. मंधानाने 47 चेंडूत 53 धावा करुन बाद झाली. आपल्या या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. तर प्रतिका रावलने देखील 86 चेंडूत 76 धावा करुन सध्या क्रिजवर आहे. आपल्या या खेळीत 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश आहे. तर हरलीन देओल सध्या 41 चेंडूत 30 धावा करुन सध्या क्रिजवर आहे. आपल्या या खेळीत 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. भारताची धावसंख्या सध्या 29 ओव्हरनंतर 173 अशी आहे.

दरम्यान प्रतिका रावलची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील पहिले अर्धशतक आहे. भारतीय फलंदाजांच्या चांगल्या खेळीनंतर टीम इंडियाची धावसंख्या चांगल्या टार्गेट जवळ जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2024 03:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).