IPL Auction 2025 Live

SL vs NZ: न्यूझीलंडचा श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय; पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड वरचढ, उपांत्य फेरीची शर्यत बनली रंजक

सध्याची परिस्थिती पाहता न्यूझीलंडचा संघ दुसरा सामना जिंकताच उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करू शकतो.

SL vs NZ (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2022 (T20 WC 2022) गट 1 च्या गुणतालिकेत न्यूझीलंड (New Zealand) संघ अव्वल स्थानावर कायम आहे. श्रीलंकेविरुद्ध (SL vs NZ) मोठा विजय मिळवत किवींनी पहिले स्थान पक्के केले असून यासह उपांत्य फेरी (Semi Final) गाठण्याची शर्यतही रंजक बनली आहे. सध्याची परिस्थिती पाहता न्यूझीलंडचा संघ दुसरा सामना जिंकताच उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करू शकतो. T20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 च्या गट 1 मध्ये, न्यूझीलंड 5 गुणांसह अव्वल आहे. संघाने दोन सामने जिंकले आहेत, तर संघाचा एक सामना अनिर्णित राहिला.

किवी संघाचा निव्वळ रन रेट सध्या +3.850 आहे. त्याचवेळी, इंग्लंडचा संघ सध्या या गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या खात्यात 3 सामन्यांनंतर केवळ 3 गुण आहेत, कारण संघाने एक सामना गमावला आहे आणि एक सामना जिंकला आहे आणि एक सामना अनिर्णित आहे. (हे देखील वाचा: SL vs NZ: रीले रूसो नंतर न्युझीलँडच्या ग्लेन फिलिप्सने विश्वचषकात ठोकले शतक, ठरला दुसरा फंलदाज)

क्रंमाक संघ सामने नेट रन रेट प्वाइंट्स
1. न्यूजीलैंड 3 +3.850 5
2. इंग्लैंड 3 +0.239 3
3. आयरलैंड 3 -1.169 3
4. ऑस्ट्रेलिया 3 -1.555 3
5. अफगानिस्तान 3 -0.620 2
6. श्रीलंका 3 -0.890 2

ग्रुप 1 मध्ये आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे देखील 3-3 गुण आहेत आणि या दोन्ही संघांनी 3-3 सामने देखील खेळले आहेत ज्यात प्रत्येकी एक विजय, एक पराभव आणि प्रत्येकी एक सामना आहे. अशा स्थितीत आगामी सामन्यांमध्ये जो संघ एकही सामना हरेल, त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग जवळपास बंद होणार आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आयर्लंडचा त्रास वाढला आहे. आता या गटातून उपांत्य फेरीत कोण पोहोचणार हे पाहायचे आहे.