WTC Point Table 2025: डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत मोठे बदल, टीम इंडियाला बंपर फायदा; बांगलादेशचे नुकसान

IND vs BAN: डब्ल्यूटीसी 2023-25 ​​सायकलमध्ये (WTC Point Table 2025- टीम इंडियाकडे अद्याप दोन कसोटी मालिका शिल्लक असतानाही, टीम इंडियाने बांगलादेशचा 2-0 असा पराभव करून पहिल्या स्थानावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

Team India (Photo Credit - X)

IND vs BAN 2nd Test 2024: भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या (WTC 2025) अंतिम फेरीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने (Team India) आणखी एक कसोटी मालिका जिंकली आहे. भारताने बांगलादेशचा 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश केला आहे. डब्ल्यूटीसी 2023-25 ​​सायकलमध्ये (WTC Point Table 2025- टीम इंडियाकडे अद्याप दोन कसोटी मालिका शिल्लक असतानाही, टीम इंडियाने बांगलादेशचा 2-0 असा पराभव करून पहिल्या स्थानावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. त्याचवेळी, कानपूर कसोटी सामन्यात 7 विकेट्सने पराभव केल्यामुळे बांगलादेश संघाला WTC गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे.

गुणतालिकेत बांगलादेश सातव्या स्थानावर घसरला

कानपूर कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया 71.67 टक्के विजयासह अव्वल स्थानावर होती आणि आता टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 74.24 झाली आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ 39.29 टक्के विजयासह पाचव्या स्थानावर होता आणि आता तो सातव्या स्थानावर घसरला आहे. WTC 2025 च्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 62.50 आहे. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा संघ आहे, ज्याने न्यूझीलंडला पराभूत करून तिसरे स्थान मिळविले. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी 55.56 आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 42.19 आहे.

हे देखील वाचा: Rohit Sharma Sixes Record: रोहित शर्माच्या नावावर 'बाहुबली' विक्रमाची नोंद, कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी 'ही' कामगिरी करणारा ठरला एकमेव कर्णधार

कसा रहिला सामना

कानपूर कसोटीत पावसामुळे दोन दिवस खेळ होऊ शकला नाही. तरीही टीम इंडियाने सात गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाने कानपूर कसोटी पाचव्या दिवशी सात गडी राखून जिंकली. यासह टीम इंडियाने बांगलादेशचा सफाया केला. भारतासमोर दुसऱ्या डावात 95 धावांचे लक्ष्य होते, जे रोहित आणि कंपनीने अवघ्या 17.2 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. घरच्या मैदानावर भारताचा हा सलग 18वा मालिका विजय आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif