Beirut Blast: '2020 सर्वांना गुडघे टेकायला भाग पाडतंय'! बैरूट शहरात झालेल्या स्फोटात 100 हुन अधिक ठार; विराट कोहली, युवराज सिंह समवेत क्रिकेटपटुंनी व्यक्त केला शोक
या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या साथीदारांनी शक्तिशाली स्फोटानंतर लेबनानच्या लोकांकरिता प्रार्थना केली आणि शोक व्यक्त केला.
मंगळवारी, 4 ऑगस्ट रोजी लेबनान (lLebanon) देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट शहरामध्ये बंदराशेजारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं. या स्फोटांमध्ये 100 जण ठार झाले तर 4000 जण जखमी झाल्याची माहिती आहे. स्फोटाची व्यापकता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र स्फोट नेमके कशामुळे झाले हे समजू शकलेलं नाही. देशाचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून या भयंकर घटनेवर जगभरातून दुःख व्यक्त केले जात आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या साथीदारांनी शक्तिशाली स्फोटानंतर लेबनानच्या लोकांकरिता प्रार्थना केली आणि शोक व्यक्त केला. स्थानिकांकडून स्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यात गोदामाला आग लागल्याचे दिसून आले आणि काही मिनिटांतच महाभयंकर स्फोट झाले ज्याच्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं. (Beirut Blast: लेबनानची राजधानी बेरूतमध्ये झालेल्या स्फोटांत 10 जणांचा मृत्यू; पहा व्हिडिओ)
"वेदनादायक आणि धक्कादायक. माझे विचार आणि प्रार्थना लेबनानच्या लोकांसह आहे," विराट कोहलीने म्हटले.
“हे भितीदायक दिसते. किती लोक जखमी किंवा आणखी वाईट होतील याची केवळ कल्पनाच करू शकत नाही.ते देखील या महामारीच्या वेळी. एक देश म्हणून लेबनान कोणत्या परिस्थितीतून जात असेल याची कल्पनाही करू शकत नाही,” दिनेश कार्तिकने ट्विट केले. कार्तिकने या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला.
मयंक अग्रवालने लेबनानच्या स्फोटात प्रभावित झालेल्या लोकांसाठी प्राथर्ना केली.
"जीव गमावणे नेहमीच दुःखद असते. लेबनानच्या लोकांसाठी मी प्रार्थना करतोय," रवींद्र जडेजाने लिहिले.
"हे भयानक आहे," दीप दासगुप्ताने म्हटले.
मिताली राज
युवराज सिंहनेदेखील या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. “बैरूटमधील स्फोटाची दृश्य विचलित करणारी आहे. तेथील स्थानिक नागरिकांची अवस्था काय झाली असेल याचा विचारही करता येऊ शकत नाही. या घटनेत ज्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. 2020 खरंच सर्वांना आपले गुडघे टेकायला भाग पाडतं आहे”, युवीने ट्विट करत म्हटले.
आकाश चोपडा
कुलदीप यादव
स्फोटाबाबत राष्ट्रपति मिशेल ओउन यांनीही ट्विट केले आणि तब्बल 2,750 टन अमोनियम नायट्रेट गोदामात असुरक्षित पणे साठवले गेले ज्यामुळे नैसर्गिक स्फोट झाल्याचे म्हटले. घटनेनंतर लेबनानमध्ये तीन दिवसांचा शोक कालावधी जाहीर करण्यात आला आहे. एका आपत्तीजनक घटनेनंतर आपत्कालीन निधीसाठी 100 अब्ज लीरा (£50.5m; $66m) जाहीर करणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे. इमारत कोसळल्यानंतर या भागात लोक अडकल्याचे व्हिडिओ स्थानिक वृत्त वाहिन्यांनी दाखवले. स्फोटानंतरच्या फोटोंमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे दर्शविले गेले तर कार व इतर वाहनांचेही नुकसान झाले.