IPL 2020 चे युएई येथे आयोजन करण्यासाठी BCCIने अमिराती क्रिकेट बोर्डाला कोटी रुपयांची दिली मोठी रक्कम, ऐकून तुमचे डोळे विस्फारतील

युएई येथे नुकत्याच संपुष्टात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2020च्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) युएईच्या एमिरेट्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) मोठ्या प्रमाणात पैसे दिले आहेत. बीसीसीआयने युएई येथे 60 सामन्यांचे आयोजन करण्यासाठी अमीरात क्रिकेट बोर्डाला 100 कोटी रुपये दिले आहेत.

मुंबई इंडियन्स आयपीएल 2020 (Photo Credit: PTI)

युएई येथे नुकत्याच संपुष्टात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020च्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) युएईच्या एमिरेट्स क्रिकेट बोर्डाला (Emirates Cricket Borad) मोठ्या प्रमाणात पैसे दिले आहेत. भारतात कोरोना व्हायरसची स्थिती खराब असताना आयपीएलचे (IPL) आयोजन करण्यासाठी महामारीच्या काळात ईसीबी (ECB) बीसीसीआयच्या मदतीला धावले आणि आखाती देशात आयपीएल सहजतेने पार पाडण्यास मदत केली. जेव्हा भारतात कोरोनाची प्रकरणं चिंताजनकपणे वाढत असल्याने आयपीएलवर पूर्णपणे रद्द होण्याचा धोका होता आणि आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने दुबई, अबू धाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये आयपीएचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. आणि बीसीसीआयने युएई (UAE) येथे 60 सामन्यांचे आयोजन करण्यासाठी अमीरात क्रिकेट बोर्डाला 100 कोटी रुपये दिले आहेत. (IPL 2021: आयपीएलच्या पुढच्या पर्वात आणखी एका नव्या संघाची भर पडण्याची शक्यता, नवव्या संघासाठी BCCI तयारी करत असल्याचे वृत्त)

Bangalore Mirrorच्या अहवालानुसार, बीसीसीआयने आयपीएल 2020 चे आयोजन करण्यासाठी ECB ला तब्बल 14 लाख डॉलर्स दिले. अहवालात पुढे म्हटल्यानुसार बीसीसीआयने नुकत्याच एका फ्रँचायझीसाठी होस्टिंग फी वाढवल्यानंतर भारतातील राज्य संघटनांनी 60 खेळांसाठी 60 कोटी रुपये कमावले असते. अहवालात असेही म्हटले की काही आयपीएल संघांनी दावाकेला की राज्य संघटनांनी सर्व सुविधा पुरविल्यामुळे भारतातील मोठ्या प्रमाणावर होस्टिंग फी आकारली जाईल. “युएईमध्ये गर्दी नव्हती, सुरक्षिततेची चिंता नव्हती आणि फ्रॅंचायझींना सराव सुविधांसाठी पैसे द्यावे लागले,” एका फ्रँचायझी अधिकाऱ्याने सांगितले.

अहवालात असेही सुचवले आहे की ‘जवळजवळ 14 पंचतारांकित हॉटेल्स जवळजवळ तीन महिन्यांपर्यंत पॅक’ असल्याने आयपीएल 2020 च्या आयोजनामुळे युएईच्या व्यवसायात भर पडली असती. दरम्यान, यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने शानदार खेळी करत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. नव्या नियमांनुसार, आयपीएलमधील एक गेम आयोजित करण्यासाठी राज्य संघटनेला 1 कोटी रुपये मिळतील. बीसीसीआयने नुकतंच प्रत्येक सामन्यासाठी फ्रँचायझीसाठी होस्टिंग फी 30 लाख रुपयांवरून 50 लाखांपर्यंत वाढवली. नियमांनुसार, बोर्ड फ्रँचायझींनी भरलेल्या रकमेची जुळवाजुळव करेल, ज्यायोगे राज्य संघटनेने प्रत्येक खेळासाठी एक कोटी रुपये कमावतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now