IPL Auction 2025 Live

विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यात फूट? संघ व्यवस्थापनाने दिले हे स्पष्टीकरण

पण, विराट आणि रोहित यांच्यातील वाद ही निव्वळ अफवा असल्याचे संघ व्यवस्थापनानं म्हटले आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credits: FIle Image)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघात फूट पडल्याचे बोलले जात होते. विश्वचषकमधील पराभवानंतर भारतीय संघ दोन गटांमध्ये विभागला गेला आहे अशी चर्चा सुरु होती. यात पहिला गट हा कर्णधार विराट कोहली (Virat KohlI) चा असून दुसरा हा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चा आहे. कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री चर्चा न करता निर्णय घेतात, त्यामुळे संघाचे नुकसान होत आहे. त्यामुळे रोहितकडे संघाचे कर्णधारपद जाणार अशी चर्चा होती. पण टाईम्य ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, विराट आणि रोहित यांच्यातील वाद ही निव्वळ अफवा असल्याचे संघ व्यवस्थापनानं म्हटले आहे. (India vs West Indies Series 2019 Schedule: टीम इंडिया च्या वेस्ट इंडिज दौर्यामधील सगळ्या सामन्यांचे वेळापत्रक)

"विराट आणि रोहित यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा खोट्या आहेत. फक्त स्वतःच्या फायद्यासाठी संघात गटबाजी असल्याच्या केवळ बातम्या पसरवण्यासाठी करण्यात आल्या होत्या. हे अतिशय दुर्दैवी आहे", असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, विश्वचषकनंतर आता भारतीय संघ आता वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर जाणार आहे. या दौर्याला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड 19 जुलैला होणार आहे. विंडीज दौऱ्यात विराट, जसप्रीत बुमराह, महेंद्र सिंघ धोनी, मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली जाऊ शकते. पण, कोहलीने या मालिकेत खेळणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि निवड समितीला याबाबाद सूचित करण्यात आले आहे.