IPL Auction 2025 Live

INDW vs BANW: तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा भारतावर 3 विकेट्सने विजय, भारतीय संघाची मालिकेत 2-1 ने बाजी

प्रथम खेळताना भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 102 धावा केल्या.

IND W Vs BAN W (Image Credit - BCCI Twitter)

बांगलादेशच्या महिला संघाने अखेरच्या टी20 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. टी 20 मालिकेत भारताने 2-1 च्या फराकाने विजय मिळवला आहे. आज झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने भारताचा 4 विकेटने पराभव केला. तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय महिला फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 103 धावांचे आव्हान ठेवले होते. बांगलादेशने हे आव्हान 18.1 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले.

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 102 धावा केल्या. टीम इंडियासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने 41 चेंडूत 40 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. तिच्याशिवाय जेमिमाने 28 धावांचे योगदान दिले. या दोन खेळाडूंशिवाय एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही.

भारताने दिलेल्या 103 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने आश्वासक सुरुवात केली. बांगलादेशकडून शमीमा सुल्ताना हिने 46 चेंडूत 42 धावांची मॅचविनिंग खेळी केली. या खेळीत शमीमा सुल्ताना हिने तीन चौकार लगावले. शमीमा सुल्ताना हिच्याशिवाय बांगलादेशच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.

बांगलादेशने तिसर्‍या टी-20 सामन्यामध्ये शानदार पुनरागमन केले आणि 4 गडी राखून शानदार विजय नोंदवला. या विजयात रुबिया खान आणि शमीमा सुलताना या विजयाच्या नायक होत्या. रुबियाने 4 षटकात 16 धावा देत 3 बळी घेतले. त्याचबरोबर शमीमाने 42 धावांची खेळी केली.