Bangladesh Women Beat Pakistan Women: बांगलादेश महिलांनी पाकिस्तान महिला संघाचा 23 धावांनी केला पराभव
यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ हा 117 वर ऑल ऑऊट झाला.
Bangladesh Women's National Cricket Team VS Pakistan Women's National Cricket Team Match Scorecard: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 (ICC Women's T20 World Cup 2024) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा यूएईच्या (UAE) यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी टीम इंडियासह (Team India) सर्व 10 संघ यूएईला पोहोचले आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, सर्व संघांना एक सराव सामना खेळायचा आहे. आज पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचा सामना हा बांग्लादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघा दरम्यान झाला. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला आहे. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 140 धावा केल्या. बांगलादेशकडून शोमा अकतरने सर्वाधिक 28 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून सादिया इक्बालने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. (हेही वाचा - ICC Women's T20 World Cup 2024 मध्ये टीम इंडियाचे सराव सामने आजपासून, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार विनामूल्य सामना)
पाहा पोस्ट -
दरम्यान 141 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाला बांगलादेशच्या गोलंदाजांनी मैदानात टिकू दिले नाही. यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ हा 117 वर ऑल ऑऊट झाला. पाकिस्तान कडून ओमिमा सोहेलने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. तिझ्या व्यतीरिक्त कोणालाच मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशच्या चार गोलंदाजांनी 2 विकेट प्राप्त केल्या.