Bangladesh Beat Pakistan, 1st Test: रावळपिंडीच्या मैदानावर पाकिस्तानने नमवत बांगलादेशने रचला मोठा इतिहास

जेव्हा त्यांना आणखी मोठी धावसंख्या करण्याची संधी होती. मात्र, पाकिस्तानने तसे केले नाही आणि कर्णधार शान मसूदने डाव घोषित केला.

BAN Team (Photo Credit - X)

रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव (BAN Beat PAK 1st Test) केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात 6 बाद 448 धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशने 565 धावा केल्या आणि 117 धावांची आघाडी घेतली. बांगलादेशने दुसऱ्या डावात पाकिस्तानला 146 धावांत गुंडाळले. बांगलादेशने 30 धावांचे लक्ष्य 10 गडी राखून पूर्ण केले. पाच दिवस चाललेल्या या सामन्यातील विजयानंतर बांगलादेशने या मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आहे. (हेही वाचा - Bangladesh Beat Pakistan, 1st Test: बांगलादेश जोमात, पाकिस्तान कोमात! त्यांच्याच घरात केला करेक्ट 'कार्यक्रम'; पराभवाची ठरले हे 3 मोठे कारण)

पाहा पोस्ट -

या सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानने 448 धावांवर डाव घोषित केला होता. जेव्हा त्यांना आणखी मोठी धावसंख्या करण्याची संधी होती. मात्र, पाकिस्तानने तसे केले नाही आणि कर्णधार शान मसूदने डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही सतरावी वेळ आहे जेव्हा एखाद्या संघाने पहिला डाव घोषित केला आणि तरीही पराभवाला सामोरे जावे लागले.  याआधी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात एकूण 13 कसोटी सामने खेळले गेले. पाकिस्तानने 12 कसोटी सामने जिंकले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता.