BAN vs SA 1st Test 2024 Day 3 Live Streaming: थोड्याच वेळात तिसऱ्या दिवसाचा खेळाला होणार सुरुवात, बांगलादेशने 3 विकेट गमावून केल्या 101 धावा; 'इथं' जाणून घ्या कुठे पाहणार लाइव्ह सामना
बांगलादेशकडून महमुदुल हसन जॉयने 80 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या असून मुशफिकर रहीमने 26 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आहेत.
Bangladesh National Cricket Team vs South Africa National Cricket Team 1st Test 2024: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला 21 ऑक्टोबवरपासून सुरुवात झाली आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 27.1 षटकांत 3 गडी गमावून 101 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून महमुदुल हसन जॉयने 80 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या असून मुशफिकर रहीमने 26 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आहेत. यजमान संघ अजूनही 101 धावांनी पिछाडीवर आहे. अशा स्थितीत बांगलादेशला तिसऱ्या दिवशी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना कागिसो रबाडाने 2 आणि केशव महाराजने 1 बळी घेतला.
काइल वेरेनने झळकावले शानदार शतक
याशिवाय दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 88.4 षटकांत 308 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेसाठी काइल वेरेनने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. काइल वेरेनने 144 चेंडूत 114 धावांची खेळी केली. तसेच, बांगलादेशकडून गोलंदाजीत तैजुल इस्लामने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: Kagiso Rabada New Record: कागिसो रबाडाने इतिहास रचला, 300 बळी घेतले, कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी विकेट; वकार युनुसला टकले मागे)
कधी, कुठे अन् किती वाजता पाहणार सामना?
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस बुधवार, 23 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल. तसेच दोन सामन्यांची कसोटी मालिका भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केली जाणार नाही. तथापि, ही मालिका फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात थेट प्रसारित केली जाईल. अशा परिस्थितीत चाहत्यांना कसोटी सामन्याच्या ति खेळाचा आनंद घेता येईल.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
बांगलादेशः शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जखार अली, नईम हसन, तैजुल इस्लाम, हसन महमूद.
दक्षिण आफ्रिका: टोनी डी झॉर्झी, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, रायन रिकेल्टन, मॅथ्यू ब्रिट्झके, काइल वेरेन (विकेटकीपर), वियान मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, डेन पिएड.