Babar Azam Sexual Harassment Allegations: बाबर आझमला लाहोर कोर्टाचा दणका, लैंगिक छळाच्या आरोपाखाली FIR चे दिले आदेश
नोव्हेंबर 2020 मध्ये एका महिलेने बाबर आजमवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
Babar Azam Sexual Harassment Allegations: लाहोर (Lahore) येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने लैंगिक छळाच्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अडचणीत सापडला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये एका महिलेने बाबर आजमवर लैंगिक छळाचा (Babar Azam Sexual harassment) आरोप केला होता. आपल्या तक्रारीत पाकिस्तानी (Pakistan) महिलेने लग्नाची खोटी आश्वासने दिल्यानंतर बाबरने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. बाबरने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले असल्याचेही या महिलेने सांगितले. PTIच्या म्हणण्यानुसार याचिकाकर्त्याने तिची वैद्यकीय कागदपत्रे न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश नोमन मुहम्मद नईम यांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नसीराबाद पोलिस ठाण्याचे एसएचओला ताबडतोब बाबरविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले आहे. संपूर्ण चौकशीची हमी देण्यास हे आरोप त्रासदायक व गंभीर असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले. (बाबर आझमचा लव्ह, सेक्स आणि धोखा; पाकिस्तानी कर्णधारावर महिलेचे लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप)
याआधी आणखी एक अतिरिक्त सत्र न्यायाधीश आबिद रझा यांनी बाबर आणि त्याच्या कुटुंबाला आरोपी महिलेचा छळ करु नये असा आदेश दिला होता. त्यांनी हा खटला मागे घेण्याचा धमकी देत असल्याचे आरोपी महिलेने म्हटले होते. तिने नसीराबाद पोलिस स्टेशनमध्ये क्रिकेटरविरूद्ध एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाबरने तिला लग्नाच्या आश्वासनावरुन अर्ज मागे घेण्यास भाग पाडले असा आरोप महिलेने केला आहे. दरम्यान, अंगठयाच्या फ्रॅक्चरमुळे न्यूझीलंड दौऱ्यावर संपूर्ण मालिकेला मुकणार बाबर सध्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध घरच्या कसोटी आणि टी-20 मालिकांच्या तयारीला लागला आहे. 26 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान पाकिस्तान आणि आफ्रिका संघात 2 कसोटी व 3 टी -20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
दुसरीकडे, महिलेने यापूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, "बाबर आझम एक क्रिकेटर नव्हता तेव्हापासून दोघांचे संबंध होते. 2014 मध्ये त्याची पाकिस्तान संघात निवड होताच त्याच्या वागण्यात बदल झाला. पुढच्या वर्षी मी त्याला लग्न करण्यास सांगितले पण त्यांनी नकार दिला. 2016 मध्ये जेव्हा मी म्हणाले की मी गर्भवती आहे, त्याने विचित्र वागणे सुरू केले आणि माझा शारीरिक छळ केला. मी हे सर्व माझ्या कुटूंबाला सांगितले नाही कारण आम्ही घरातून पळून आलो होतो."