'विराट कोहली आणि मी वेगळ्या प्रकारचे खेळाडू', टीम इंडिया कर्णधाराबरोबरच्या तुलनेवर पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम ने सोडले मौन
अलीकडेच पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलेला आजम वनडे क्रमवारीत तिसर्या तर कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने म्हटले की, त्याची तुलना भारतीय कर्णधार विराट कोहलीशी (Virat Kohli) केली जाऊ नये कारण ते दोघेही वेगवेगळे फलंदाज आहेत. अलीकडेच पाकिस्तानच्या (Pakistan) वनडे आणि टी-20 कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलेला आझम वनडे क्रमवारीत तिसर्या तर कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, टी-20 रँकिंगमध्ये आजम अव्वल तर कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर कसोटी क्रमवारीत कोहली दुसर्या क्रमांकावर आहे तर आझम पाचव्या क्रमांकावर आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आजमने स्थानिक माध्यमांना सांगितले की, "मला वाटते माझी विराट कोहलीशी तुलना केली जाऊ नये, तो वेगळ्या प्रकारचा खेळाडू आहे आणि मी एक वेगळ्या प्रकारचा आहे. माझे काम माझ्या संघासाठी सामने जिंकणे हे आहे आणि मी त्यावर लक्ष केंद्रित करतो, तुलना करण्यावर नाही." सध्याच्या युगात कोहली, हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, तर सध्याच्या युगातील आझम हा एक उदयोन्मुख फलंदाज आहे आणि म्हणूनच बहुतेकदा आजम आणि विराटची तुलना केली जाते. (विराट कोहली की रवींद्र जडेजा? सर्वोत्कृष्ट फील्डर वादावर टीम इंडिया कर्णधाराच्या प्रतिक्रियेने जिंकली Netizens ची मनं)
तो पुढे म्हणाला, "मी फक्त चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि जेव्हा मी मैदानात येतो तेव्हा मी प्रत्येक वेळी माझ्या संघाला जिंकवण्याचा प्रयत्न करतो." आपल्या कर्णधारपदाबद्दल विचारले असता आजम म्हणाला की, तो मैदानावर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल. तो म्हणाला, "कर्णधार म्हणून मला शांत असण्याची गरज आहे." कोविड-19 महामारी पाहता रिक्त स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता आजम म्हणाला की, युएईच्या मैदानावर यापूर्वीच 10 वर्षांहून अधिक काळ रिकाम्या स्टँडमध्ये त्यांच्या घरच्या बहुतेक मालिका खेळल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांना सवय झाली आहे. “गेल्या 10 वर्षात दुबईत आमचे बहुतेक क्रिकेट खेळत असल्याने प्रेक्षकांशिवाय खेळायला कसे वाटते हे इतर संघांपेक्षा आम्हाला चांगले माहिती आहे. ही चाहत्यांसाठी आणि आमच्यासाठीही चांगली भावना नाही."
गेल्या वर्षी फॉर्मेटमध्ये जगातील आघाडीचा फलंदाज म्हणून ओळख निर्माण करणारा आझमने विकेटकीपर-फलंदाज सरफराज अहमदची 2020-21 च्या मोसमातील वनडे कर्णधार म्हणून जागा घेतली. आजमला यापूर्वी टी -20 कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.