Babar Azam Record: बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा विक्रम, बनला सर्वात जलद 10,000 धावा करणारा आशियाई फलंदाज

या प्रकरणात त्याने कोहलीचा विक्रम मोडला. कोहलीने 232 डावात ही कामगिरी केली. यासोबतच दिग्गज सुनील गावस्कर, सौरव गांगुली आणि जावेद मियांदाद यांनाही मागे टाकले आहे.

Babar Azam And Virat Kohli (Photo Credit - Twitter)

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Baba Azam) याचे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत (Virat Kohli) चांगले संबध असू शकते, पण हे सर्व मैदानाबाहेर आहे. मैदानात उतरताच बाबरचे लक्ष्य नेहमीच विराट कोहलीच्या रेकॉर्डवर असते. बाबर सातत्याने कोहलीच्या खराब फॉर्मचा फायदा घेत त्याचे विक्रम मोडीत काढत आहे. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. बाबरने कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला आणि सर्वात जलद 10,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. बाबरने श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत ही कामगिरी केली. खरे तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी20) सर्वात कमी 228 डावांमध्ये 10,000 धावा करणारा बाबर हा आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. या प्रकरणात त्याने कोहलीचा विक्रम मोडला. कोहलीने 232 डावात ही कामगिरी केली. यासोबतच दिग्गज सुनील गावस्कर, सौरव गांगुली आणि जावेद मियांदाद यांनाही मागे टाकले आहे.

सर्वात जलद 10,000 धावा करणारा आशियातील टॉप-5 क्रिकेटपटू

बाबर आझम : 228 डाव

विराट कोहली : 232 डाव

सुनील गावस्कर : 243 डाव

जावेद मियांदाद: 248 डाव

सौरव गांगुली : 253 डाव

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्सच्या नावावर आहे. त्याने 206 डावात हे स्थान गाठले. रिचर्ड्सनंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हाशिम आमला (217 डाव), वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा (220 डाव) आणि जो रूट (222 डाव) यांचा क्रमांक लागतो. (हे देखील वाचा: Kapil Dev Statement: विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर कपिल देव यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले - त्याच्याशिवाय खेळणे सोपे जाणार नाही)

सर्वात जलद 10,000 आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या एकूण यादीत बाबर पाचव्या क्रमांकावर आहे. या कामगिरीबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही (पीसीबी) बाबरचे अभिनंदन केले आहे. पीसीबीने ट्विटरवर लिहिले - 10 हजार आंतरराष्ट्रीय धावा. ही कामगिरी करणारा 11वा पाकिस्तानी फलंदाज बनल्याबद्दल कॅप्टन बाबरचे अभिनंदन.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif