वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनने केला खुलासा, IPL मुळे विराट कोहली ला स्लेज करत नाही ऑस्ट्रेलियाई खेळाडू

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानला जातो आणि क्लार्कला असे वाटते की बरेच आंतरराष्ट्रीय संघ पैशापुढे दाबून जातात.

विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

आयपीएल (IPL) करारामुळे कांगारू खेळाडू भारतीय कर्णधार विराट कोहलीविरूद्ध (Virat Kohli) आक्रमकता दर्शविण्याचे टाळतात असा दावा ऑस्ट्रेलियाचा (Australia) 2015 वर्ल्ड कप विजेता आणि माजी कर्णधार माइकल क्लार्कने (Michael Clarke) केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानला जातो आणि क्लार्कला असे वाटते की बरेच आंतरराष्ट्रीय संघ पैशापुढे दाबून जातात. क्लार्क म्हणाला की, आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशांमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू घरच्या मालिकेदरम्यान विराटविरुध्द स्लेज करण्यास असमर्थ होते. शिवाय स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरचा संघात समावेश नसलेल्या भारताने मालिका 2-1 अशी जिंकली. भारतीय टीमने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, जिथे त्यांनी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर टेस्ट मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. या मालिकेदरम्यान स्मिथ आणि वॉर्नरवर बॉल टेम्परिंगमुळे बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे त्यांना या दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली नाही.  (IPL मध्ये RCB च्या पराभवाचे कारण ते आवडता बॅटिंग पार्टनर; केविन पीटरसनसोबत इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान विराट कोहलीने केले महत्वाचे खुलासे)

क्लार्कने बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्टला सांगितले की, “भारतीय संघ केवळ आंतरराष्ट्रीयच नाही तर आयपीएलमधील स्थानिक पातळीवरही आर्थिकदृष्ट्या किती मजबूत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. माझ्या मते ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि शक्यतो इतर संघ काही काळ वेगळ्या लयीत जाऊन भारतासमोर दाबून जातात. एप्रिल महिन्यात भारतीय खेळाडूंसोबत आयपीएल खेळायचा असल्याने क्रिकेटपटू विराट किंवा इतर खेळाडूंना स्लेज करण्यास घाबरत आहेत.” विश्वचषक विजेत्या कर्णधाराने असेही म्हटले आहे की अनेक भारतीय सुपरस्टार्सदेखील भारतीय क्रिकेटर्स आयपीएल (IPL) फ्रँचायझीचे कर्णधार असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्यांना स्लेज करण्यास करत नाही.

क्लार्क म्हणाला, “दहा खेळाडूंची यादी करा आणि ते या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांच्या आयपीएल संघात जाण्यासाठी बोली लावतात. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन असे आहे की, मी कोहलीला स्लेज करणार नाही. कारण त्याने मला आरसीबीसाठी विकत घ्यावे अशी माझी इच्छा आहे जेणेकरुन मला 6 आठवड्यांसाठी दहा लाख अमेरिकन डॉलर्स मिळतील.” क्लार्कच्या म्हणण्यानुसार, या वर्तनाने ऑस्ट्रेलियाला ठाम राहू दिले नाही आणि दशकांपासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे वैशिष्ट्य दर्शविणारा निर्दयी वर्तन हिसकावून घेतलं. 2012 मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळलेल्या क्लार्कने सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना कोहलीशी असलेल्या त्याच्या वैयक्तिक संबंधांबद्दल चिंता असते. बर्‍याच ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी आयपीएल फ्रँचायझींनी यंदाही करार केला आहे. यावर्षी आयपीएल इतिहासातील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 15.5 कोटी रुपयांत विकत घेतले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif