Australia vs Pakistan 2nd ODI: रिझवानमुळे पाकिस्तानचे झाले नुकसान, ॲडम झाम्पाच्या सल्ल्याने DRS घेणे पडले महागात
पाकिस्तानने 26.3 षटकांत 169/1 धावा करून हे लक्ष्य सहज गाठले.
Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team, 2nd ODI Match: एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला. हा सामना शुक्रवारी ॲडलेडमध्ये झाला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या डावात मोहम्मद रिझवानने ॲडम झाम्पाला डीआरएससाठी विचारले. झम्पाच्या सल्ल्याने त्याने डीआरएस घेतला आणि तो वाया गेला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा - PAK Beat AUS 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा शानदार विजय, 9 गडी राखून ऑस्ट्रेलियाचा केला पराभव; मालिका 1-1 अशी बरोबरीत )
वास्तविक ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. झम्पा त्याच्यासाठी 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी नसीम शाह पाकिस्तानकडून 34 वे षटक टाकत होता. आपल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रिझवानने अपील केले. मात्र पंचांनी कोणताही संकेत दिला नाही. त्यानंतर रिझवानने झाम्पाला डीआरएस घ्यायचे की नाही, असा प्रश्न केला. झंपा म्हणाला, 'नक्कीच घे.'