Australia Vs India 4th Test: वीरेंद्र सेहवाग यांची बीसीसीआयला ऑफर; दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागेवर खेळण्याची दर्शवली तयारी
तर, सिडनी येथे खेळण्यात आलेला तिसरा सामना अनिर्णीत राहिला आहे. दरम्यान, ब्रिस्बेन येथे चौथा आणि निर्णायक कसोटी सामना खेळला जाणार आहे.
ऑस्ट्रलिया विरुद्ध भारत (Australia Vs India) यांच्यात सुरु असलेल्या 4 कसोटी सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. तर, सिडनी येथे खेळण्यात आलेला तिसरा सामना अनिर्णीत राहिला आहे. दरम्यान, ब्रिस्बेन येथे चौथा आणि निर्णायक कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. मात्र, हा दौरा भारतीय खेळाडूंसाठी चांगला गेला नसून अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे संघ व्यवस्थापनाला भारतीय संघ निवडताना अडचणी होत आहे. यातच भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनी चौथ्या कसोटी खेळण्याची तयारी दर्शवली आहे. वीरेंद्र सेहवागचे हे मजेशीर ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
वीरेंद्र सेहवाग हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. ते ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चांहत्यांसोबत अनेकदा संवाद साधताना आपण पाहिले आहेत. त्यांच्या गंमतीशीर ट्विटचा अनेकजण आनंद घेतात. यातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागत आहे. यावरही वीरेंद्र सेहवाग यांनी मजेदार ट्विट केले आहे. ‘इतके खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. जर 11 जणांची भरती होत नसेल तर, मी ऑस्ट्रेलियाला जायला तयार आहे. क्वारंटाईनचे पाहू’अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. तसेच या ट्विटवर त्यांच्या चाहत्यांनीही मजेशीर कमेंट केल्या आहेत. हे देखील वाचा-India Vs England 2021: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात; दुखापतग्रस्त रविंद्र जाडेजा याच्या जागी 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
वीरेंद्र सेहवाग यांचे ट्विट-
भारतीय संघात दुखापतीचे सत्रच सुरु आहेत. भारतीय संघातील आतापर्यंत 9 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. या यादीत मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, मयांक अगरवाल आणि आर. अश्विन या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.